अनिल कांबळे
नागपूर,
nashik bribery राज्यात लाचखाेरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून गेल्या वर्षभरात सर्वाधिक लाचखाेरीचे सापळे नाशिक विभागातील अधिकारी आणि कर्मचाèयांवर करण्यात आले. तर दुसèया स्थानावर पुणे तर तिसèया स्थानावर छत्रपती संभाजीनगर विभाग आहे. नाशिकमध्ये 138 सापळा कारवाईत 210 लाचखाेर अधिकारी-कर्मचारी अडकले तर पुण्यात 124 सापळा कारवाईत 181 जण लाचखाेरीच्या गुन्ह्यात अडकले, ही आकडेवारी राज्य भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने जाहीर केली आहे.
गेल्या काही महिन्यांत राज्यातील लाचखाेरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक लाचखाेरी महसूल आणि पाेलिस भागात झाल्याची आकडेवारी समाेर आली आहे. राज्यातील आठ विभागाची सापळ्याची आकडेवारी एसीबी विभागाने जाहीर केली. काेणत्याही शासकीय कामासाठी लाच द्यावी लागते, हे सत्य आहे. पाेलिस, महसूल, शिक्षण आणि जिल्हा परिषद या विभागात तर जवळपास प्रत्येक काम करण्यासाठी किंवा ाईल समाेर ठेवण्यापूर्वी लाच द्यावी लागते. अनेकदा लाच मागून छळल्या जाते. त्यामुळे नागरिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करतात. राज्यात एसीबीने सर्वाधिक कारवाई नाशिक विभागात केली. नाशिकमध्ये 138 सापळा कारवाई करीत 210 लाच घेणाèया अधिकारी आणि कर्मचाèयांवर गुन्हे दाखल करुन अटक केली. दुसèया स्थानावर पुणे शहराचा क्रमांक असून एसीबीने 124 सापळा कारवाई केली असून 181 लाचखाेर कर्मचाèयांवर कारवाई करण्यात आली. तिसèया स्थानावर असलेल्या छत्रपती संभाजीनगरात 109 सापळ्यात 160 लाचखाेर अडकले असून चाैथ्या स्थानावर ठाणे विभागाचा क्रमांक असून 83 सापळ्यात 125 लाचखाेरांना अटक केली. नागपूर शहर हे सातव्या स्थानावर असून 54 सापळा कारवाईमध्ये 78 लाचखाेरांना अटक करण्यात आली. शासकीय कर्मचाèयाने शंभर रुपयांपासून ते पाच काेटी रुपयांपर्यंत लाच मागितल्याची प्रकरणे एसीबीकडे दाखल आहेत. राज्यात 682 सापळा कारवाईमध्ये 1 हजार 9 लाचखाेर अडकल्याची माहिती एसीबीने संकेतस्थळावर प्रकाशित केली.
पाेलिस-महसूल विभाग सर्वाधिक भ्रष्ट
राज्यात महसूल विभागातील सर्वाधिक लाचखाेर कर्मचाèयांना लाच घेताना अटक करण्यात आली. राज्यात महसूल विभातील 168 सापळ्यात 248 लाचखाेर कर्मचाèयांना अटक करण्यात आली. दुसèया स्थानावर पाेलिस विभाग असून 120 सापळ्यात 172 पाेलिसांना लाच घेताना अटक करण्यात आली. तर तिसèया स्थानावर पंचायत समिती असून 69 सापळ्यात 98 लाचखाेरांना अटक करण्यात आली. त्यानंतर लाचखाेरीत वीज विभाग आणि महानगर पालिका विभागाचा क्रमांक लागताे.
राज्यात 68 ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांना अटक
राज्यात लाचखाेरांचा आकडा माेठा असून वर्षभरात 669 सापळा कारवाई करण्यात आल्या असून 988 अधिकारी-कर्मचाèयांना लाच घेताना अटक करण्यात आली. त्यात तब्बल 68 क्लास वन दर्जाच्या अधिकाèयांचा समावेश आहे. तसेच वर्ग दाेनच्या 126 लाचखाेर अधिकाèयांचा समावेश आहे. 3 काेटी 54 लाख रुपये एवढी रक्कम लाचखाेरांकडून जप्त केली आहे. 447 तृतीय श्रेणी कर्मचाèयांचा समावेश लाचखाेरीच्या प्रकरणात आहे.