नागपूर,
operation-nanhe-farishte : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने प्रवाशांची सुरक्षा आणि सामाजिक बांधिलकी या द्विसूत्रीवर भर देत ’ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ गेल्या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. गेल्या वर्षभरात अशा प्रकारे नागपूर विभागात १३५ आणि १२३ मुली अशा एकूण २५८ अल्पवयीन मुलांना त्यांच्या घरी सुखरूप परत पाठविण्यात आले. विविध रेल्वे गाड्या रेल्वे स्थानकावर या मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या पालकांशी संपर्क करून त्यांना पाठविण्यात आले.
रेल्वे परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण केले तसेच समाजविघातक प्रवृत्तींवर अंकुश ठेवणे आणि गरजू घटकांना मदतीचा हात देणे या उद्देशाने रेल्वे सुरक्षा दलाकडून ऑपरेशन नन्हे फरिश्ते ही विशेष मोहीम वर्षभर राबविण्यात येते. बालमजुरी, मानवी तस्करी आणि ड्रग्ज धोकादायक प्रकारात ओढण्यासाठी ठिकठिकाणच्या गरजू आणि अल्पवयीन मुला-मुलींना वेगवेगळे आमिष दाखविण्यात येते. त्यांना महानगरातील ग्लॅमरसचे स्वप्न दाखवून पैसे आणि ऐशोआरामाचे जीवन उपलब्ध करून देण्याची थाप मारून त्यांच्या घरून, गावातून पळवून नेण्यात येते.
सापळ्यात अडकलेल्या या मुलांना महानगरात नेऊन तेथे त्यांच्याकडून बालमजुरी, ड्रग्ज तस्करी, भिक्षा मागण्यासारखे प्रकार करवून घेतले जाते. ढकलले जाते. अशा मुलांना समाजकंटकांच्या तावडीतून सोडविण्यासाठी गेल्या काही वर्षात रेल्वे सुरक्षा दलाने ’ऑपरेशन नन्हे या सारखे उपक्रम राबविणे सुरू केले. त्यानुसार, आरपीएफच्या जवानांना प्रशिक्षण या विशेष मोहिमेत सहभागी करण्यापूर्वी प्रशिक्षण दिले जाऊ लागले. त्यानंतर ही मंडळी हरवलेली, घरून पळवून आणलेली किंवा पळून आलेली मुले ताब्यात घेतात. त्यांचे चाइल्डलाइनच्या समुपदेशन करून त्यांची सुखरूप घरवापसी केली जाते.
पालकांना दिलासा, समाजाकडून कौतुक
ताब्यात घेतलेल्या संबंधित मुला-मुलींची तपासणी करणे, आवश्यक वैद्यकीय मदत देणे, समुपदेशन आणि संरक्षणाची हमी देणे आदी बाबींमुळे आरपीएफची ही विशेष मोहीम रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांवरील विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे. कारवाईची माहिती झाल्यानंतर या संबंधाने संबंधित पालकांना मिळतोच.