ग्रामीण रुग्णालयासाठी सिंदी (रेल्वे)त भजन आंदोलन!

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
सिंदी (रेल्वे), 
bhajan-movement : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला तातडीने ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी आज सोमवार ३ रोजी सिंदी रेल्वे येथे भजन आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले.
 
 
k
 
बस स्टॅण्ड चौकातील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर सकाळी १० वाजता आयोजित आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
सिंदी (रेल्वे) व परिसरातील काही गावांसाठी हे एकमेव आरोग्य केंद्र असूनही आजही ते प्राथमिक स्वरूपातच आहे. परिणामी गंभीर रुग्णांना वर्धा व नागपूर येथे हलवावे लागत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. शासन विकासावर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना सिंदीच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष का? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
 
 
टाळ-मृदंगाच्या गजरात
 
 
‘रुग्णालय हा आमचा हक्क आहे ‡ भीक नाही!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आज शांततेत भजन आंदोलन करण्यात आले असले तरी मागणी मान्य न झाल्यास यापुढे तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, आंदोलनस्थळी अ‍ॅड. सुधीर कोठारी, माजी आमदार राजू तिमांडे, निलकंठ घवघवे, सुधाकर खेडकर, अशोक बाबु कलोडे, गंगाधर कलोडे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविला.
 
 
आंदोलनात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक व विविध सामाजिक घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सिंदी (रेल्वे)ला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यत करण्यात आला.