ग्रामस्थांकडून सागर चिरडे व नम्रता निमकर यांचा सत्कार

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
sagar-chirade-namrata-nimkar : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत लोही येथे सीमा सुरक्षा दलाचे प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या सागर राजेश चिरडे व प्रथम महिला जवान नम्रता नाना निमकर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाला जवानांच्या कुटुंबियांसह ग्रामपंचायत सरपंच संजय शिंदे, उपसरपंच राजू हळदे, ग्रामसेवक विद्याधर चौधरी, सर्व सदस्य अमोल मोकळकर, अंबादास इंगोले, प्रकाश राऊत, आशिष ढोले, दुर्गा इंगोले विविध सामाजिक व राजकीय पदाधिकारी, पोलिस पाटील, गावातील ज्येष्ठ नागरिक, सार्वजनिक वाचनालयातील विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
 
 
y3Jan-Satkaar
 
कार्यक्रमाचे संचालन शिवसेना शाखा प्रमुख तुकाराम बिजवे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सागर चिरडे व नम्रता दिनकर लोहीच्या मुलामुलींसाठी प्रेरणास्थान असून, त्यांच्या या यशामुळे अनेक मुलेमुली देशसेवेसाठी पुढे येतील, असे गौरवोद्गार काढले. दोन्ही जवानांचे उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.