नागपूर,
Savitribai Phule Jayanti लोकमान्य कॉन्व्हेंटमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्रिन्सिपल पद्मजा कुलकर्णी उपस्थित होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.त्यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण केले.
त्या केवळ पहिल्या महिला शिक्षिका नव्हत्या, तर समाजातील महिलांना शिक्षणासाठी प्रेरणा देणाऱ्या एक महान समाजसुधारक होत्या. आज अनेक महिला उच्च पदांवर कार्यरत आहेत, Savitribai Phule Jayanti यामागे सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय कार्याचे मोठे योगदान आहे, असे त्यांनी नमूद केले.संगीता लाडखेडकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्त्री शिक्षणाचे महत्त्व व सामाजिक परिवर्तनाची जाणीव करून देण्यात आली.
सौजन्य:मीनाक्षी देशपांडे,संपर्क मित्र