संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी

*दहा दिवस दरवळणार भक्तीचा सुगंध

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
सेलू, 
sant-kejaji-maharaj-death-anniversary : विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बोरतिरी वसलेल्या घोराड तीर्थक्षेत्रात संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून हा पुण्यतिथी सोहळा दहा दिवस चालणार आहे. या दिवसात गावात भतीचा सुगंध दरवळणार आहे. सारे गाव एक होण्याची तयारी सुरू झाली आहे.
 
 
j k
 
 
 
संत केजाजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विठ्ठल-रखुमाई देवस्थान ट्रस्ट व संत केजाजी महाराज सेवा मंडळ यांच्या संयुत वतीने आयोजित या सोहळ्याला विदर्भातून ५० हजाराहून अधिक भाविकांची उपस्थिती राहत असल्याने येणार्‍या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी ग्रामस्थ आपल्यापरीने कामाला लागले आहे. हा धार्मिक सोहळा ११ ते २१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. श्रीराम कथा, ज्ञानेश्वरी पारायण, पालखी दिंडी सोहळा, काला दहीहंडी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
११ ते १७ जानेवारी श्रीरामकथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन असून कथा दुपारी १ ते ४, सायंकाळी ७.३० ते रात्री १० या वेळात दोन सत्रात राहणार असून या कथेचे प्रवते आळंदी येथील विश्वंभर महाराज माळोदे राहणार आहेत. ११ ते १८ जानेवारी दरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण दररोज सकाळी ७ ते १० या वेळात होईल. दिंडी सोहळा १९ जानेवारी व महाप्रसाद २० तर २१ रोजी प्रक्षाळ पुजेने सोहळ्याची सांगता होणार आहे.
 
 
संत केजाजी महाराज यांचा निर्वाण दिन १८ जानेवारी असल्याने या दिवशी विष्णू सहस्त्रनाम, संत केजाजी महाराज चरित्र पारायण, समाधी पूजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता, रात्री गावात घरोघरी व देवस्थानमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या पुण्यतिथी महोत्सवाकरिता विदर्भातील असंख्य भाविकांची उपस्थिती राहणार आहे. देवस्थान विद्युत रोषणाईने सजणार असून गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराची ग्रापंकडून रंगरंगोटी करण्यात आली आहे.