तभा वृत्तसेवा
राळेगाव,
shubha-labh-urban-womens-credit-co-operative : सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था शुभ लाभ अर्बन वुमन्स क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करत राळेगाव शहरासह वडकी येथेही नवीन शाखेची स्थापना केली आहे.
या शाखेचे अद्ययावत कार्यालय तालुक्यातील वडकी येथील बसस्थानक मार्ग, कांडुरवार कॉम्प्लेक्समध्ये उभारण्यात आले आहे. या नवीन वास्तूचा लोकार्पण समारंभ रविवार, 4 जानेवारी रोजी रोजी दुपारी 2 वाजता पार पडणार आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी या शाखेत आरटीजीएस, दैनिक ठेव, ईकलेक्शन, डेली कलेक्शन, आकर्षक व्याजदरावर गुंतवणूक, इलेक्ट्रिक बिल भरणा केंद्र तसेच लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सर्व सेवा कार्यालयीन वेळेत ग्राहकांना मिळणार आहेत.
वडकी तसेच परिसरातील स्नेही, ग्राहकवर्ग आणि नागरिकांनी या लोकार्पण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शुभ लाभ अर्बन वुमन्स क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे आशिष सायंकार यांनी केले आहे.