मला मांडायच्या आहे ‘ती’च्या अकथित कथा

अभिनेत्री साेनल मधुशंकर यांनी उलगडला अभिनय प्रवास

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
पराग मगर
नागपूर,

sonal madhushankar एक स्त्री म्हणून माझ्याकडे आणि माझ्यासारख्याच प्रत्येक स्त्रीकडे सांगण्यासारखं बरच काही आहे. किंबहुना तिने कधीही न सांगितलेलंच बरच काही बाकी आहे. मला माझ्यासह प्रत्येक स्त्रीच्या न सांगितलेल्या कथा चित्रपटातून सशक्तपणे मांडायच्या आहे. प्रेक्षकांना वास्तवाशी रूबरू करायचे आहे, असे मत अभिनेत्री साेनल मधुशंकर हिने तरुण भारतशी बाेलताना व्यक्त केले. तिच्या ‘ह्यूमन इन द लूप’ या चित्रपटाला ऑस्करचे नामांकन मिळाले आहे. यानिमित्त तिने खास संवाद साधला.
 

sonal madhushankar 
 
 
ह्यूमन इन द लूप ऑस्करच्या शर्यतीत
मूळची चंद्रपूरची sonal madhushankar रहिवासी असलेली साेनल सांगते, मी अभियंता म्हणून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मी काम केले आहे. मला मुळात अभिनय क्षेत्रात काम करायचे हाेते. पण मी घरच्यांना ही इच्छा कधीच बाेलून दाखविली नाही. अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना आधी मित्र असलेल्या माझ्या नवèयाला ती पहिल्यांदा बाेलून दाखविली. लग्नानंतर आम्ही पुण्यात राहायला गेल्यावर दाेघांनीही एक अभिनय कार्यशाळा केली. त्यानंतर आम्ही काही मित्राच्या साथीने 2014 मध्ये स्वतः ‘पुष्कर रंगमंच’ ही संस्था स्थापन केली. यांतर्गत काही नाटकेही सादर केली. यानंतर आम्ही मुंबईला आलाे आणि अभिनयाला पूर्ण वेळ द्यायचे ठरवून आर्टििफशियल इंटेलिजेन्स या क्षेत्रातील काम मी थांबविले. त्यानंतर मी राेज सकाळी घरून निघायचे आणि ऑडिशन द्यायचे. खूप ऑडिशन दिल्या. हे करताना किती मुलाखती खराेखर हाेतात आणि बनावट असतात याचे चांगले अध्ययन मी करू शकली. त्यानंतर मी यशराज साठी काम करणारे शानू शर्मा यांच्यासाठी कास्टिंग करण्याचे काम सूरू केले. या काळात अनेक अभिनेत्यांना मी जवळून पाहिलं. त्यांच्या ऑडिशन घेतल्या. हेच करीत असताना मला गंगुबाई काठियावाडीतील एका भूमिकेसाठी विचारणा झाली. काम मिळालं. आयुष्याला वेगळे वळण मिळाले. पण खरा संघर्ष नंतर हाेता कारण या चित्रपटानंतर अनेक ऑडिशन देऊनही काम मिळत नव्हते. पण मी माझ्या गतीने पुढे जात हाेते आणि काही वेब सिरीजमध्ये भूमिका मिळाल्या. त्या मिळताना मला आपल्याला आपले काम पाहून तशा भूमिका मिळत असल्याचे माझ्या लक्षात आले आणि माझ्यासारख्या इतर स्त्रियांच्या कथा आणि व्यथा मला मांडला येत आहे याचा आनंद असल्याचे साेनल सांगते.
 
आज चित्रपट लहान लहान गावात, शहरात घडताेय. तिच्या ह्यूमन इन द लूप ची कथाही अशीच लहान शहरात घडते. याविषयी साेनल सांगते, या चित्रपटामुळे मला झारखंडमधल्या आदिवासी स्त्रीचे जीवन कळले. आपल्या आसपास खूप कथा आहेत. त्या उघड्या डाेळ्यांनी बघण्याची गरज तिने व्यक्त केली. या प्रवासात मी राेज मला नव्याने सापडत असल्याचे सांगते.
 
 
साेनलचा आंतरराष्ट्रीय प्रवास
गंगुबाई काठियावाडी, sonal madhushankar दिल्ली क्राईम, दुरंगा, ब्लॅक व्हाईट अँड ग्रे सारखे चित्रपट आणि वेबसिरिजमधून काम करणाèया मराठमाेळ्या साेनलचा ह्यूमन इन द लूप हा चित्रपट 98 व्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत आहे. हा चित्रपट ऑस्कर कॅम्पेन अभियानाचा भाग असून यांतर्गत न्यूयाॅर्क, लाॅस एंजेलिस, आणि सॅन फ्रान्सिस्को यथे ताे प्रदर्शित झाला. या चित्रपटाला इंडिपेंडेंट स्लाेन डिस्टिब्यूशनचे अनुदान मिळाले आहे. याच बराेबर लंडन फिल्म स्कूलद्वारे निर्मित विंग्ज ऑफ वूड्ज या आंतरराष्ट्रीय लघू चित्रपटातही तिने काम केले आहे.