श्रीलंकेची अजब दुनिया… अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Sri Lanka tour सुंदरता, स्वच्छता आणि निसर्गसंपन्नतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रीलंकेचा अनुभव मनाला सुखावणारा ठरला. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेल्या या देशातील सुसह्य हवामान, शांत जीवनशैली आणि स्वच्छतेची शिस्त विशेष भावली. गॉल बीच, कँडी येथील हत्ती सफारी, स्पाइस गार्डन, चहा फॅक्टरी, बुद्ध गुहा तसेच धार्मिक स्थळांचे दर्शन घेतल्याने प्रवास अधिक समृद्ध झाला. प्रदूषणमुक्त वातावरण, सुंदर रस्ते व मनमिळावू लोकांमुळे हा श्रीलंकेचा प्रवास अविस्मरणीय ठरला.

shri
 
 
बुद्धाच्या पाच गुहा, ध्यानस्थ बुद्धमूर्ती, विष्णूसह बुद्धाचे दर्शन—सगळेच मनाला शांत करणारे. येथील लोकांची सौंदर्यदृष्टी, स्वच्छतेची शिस्त, कुठेही कचरा नाही Sri Lanka tour विड्याच्या पानांच्या वेलींनी भरलेला परिसर असूनही एकही पिचकारी न दिसणे हे विशेष लक्षात राहिले.निसर्ग येथे भरभरून सौंदर्य देतो, पण त्या सौंदर्याची जपणूकही तेवढ्याच प्रेमाने केली जाते. रस्ते सुंदर, रुंद, नीट आखलेले—पायी चालणाऱ्यांसाठी स्वतंत्र जागा. प्रदूषणाचा लवलेश नाही. नितळतेचा खरा अर्थ येथे अनुभवायला मिळतो.
 
सौजन्य:अचला तांबोळी,संपर्क मित्र