हवामान विभागाचा इशारा : थंडी कायम राहणार 'या राज्यात'

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
मुंबई,
cold weather नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईत पावसाच्या सरींनी हजेरी लावल्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. दक्षिण मुंबईत तुलनेने जोरदार पाऊस झाला, तर उपनगर आणि नवी मुंबईत हलक्या सरींची हजेरी होती. गुलाबी थंडीत पावसाच्या धारांनी वातावरणात बदल केला आहे आणि शहरातील नागरिकांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला अप्रत्याशित हवामानाचा अनुभव आला.
 

cold weather 
भारतीय हवामान cold weather  खात्याच्या अहवालानुसार, अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या थंड हवामानाच्या प्रभावामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमानात पुढील २४ तासांत १ ते २ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.हवामान विभागानुसार, उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट सुरू असून, दक्षिणेकडे तमिळनाडू, पुद्दुचेरीसारख्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही या बदलाचा परिणाम जाणवेल, त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात तापमानात चढउतार दिसून येईल.
 
 
थंडीचा कडाका कायम राहणार
राज्यातील विविध शहरांमध्ये गेल्या दिवसांत तापमानात घट झाली आहे. काल अहिल्यानगरमध्ये किमान १२.३, जळगाव ९.२, कोल्हापूर १७.१, महाबळेश्वर १३.५, पुणे १३.५, सांगली १६.४, सोलापूर १८.२, छत्रपती संभाजीनगर १३.८, धाराशिव १२.४, अकोला १५, अमरावती १४.५, बुलढाणा १५.६, तर मुंबईत २०.६ आणि सांताक्रुज १९.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.विदर्भ आणि मराठवाड्यातील थंडीचा कडाका वाढत असून, नागपूरसह अनेक भागांमध्ये डिसेंबरमधील किमान तापमान गेल्या काही वर्षांतले सर्वात कमी आहे. परभणीत ६.८ अंश आणि धुळ्यात ७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहेत. हवामान विभागाचा अंदाज असा आहे की, पुढील चार दिवस विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम राहणार आहे, परंतु काही ठिकाणी तापमानात १–२ अंशांची वाढ होऊ शकतेनवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईत पाऊस पडला असला तरी उर्वरित राज्यात गारठा कायम आहे. नागरिकांनी थंडीत योग्य काळजी घेणे गरजेचे असल्याचे हवामान विभागाचे चेतावणी संदेश आहेत.
 
 
 
देशाची स्थिति
देशातील अनेक भागांत cold weather  सध्या दाट धुके, तीव्र थंडी आणि मध्य भारतातील काही भागात शीतलहरीचा कहर सुरु आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार, जम्मू-काश्मीरपासून बिहार आणि ओडिशा पर्यंत मोठ्या क्षेत्रावर दाट धुक्याचे आवरण पसरले असून, अनेक भागांत दृश्यमानता ५० मीटरपेक्षा कमी झाल्याचे नोंदवले आहे.दिल्लीमध्ये दाट धुक्यामुळे ६६ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि रेल्वे वाहतुकीचा वेगही कमी केला गेला आहे. राजधानीत किमान तापमान ९.१ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान १७.४ अंश सेल्सिअस होते. हवामान विभागाने दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडसाठी दाट धुक्याबाबत रेड अलर्ट जारी केला आहे, आणि पुढील आठवड्यापर्यंत या परिस्थितीत आराम मिळण्याची शक्यता कमी आहे.
 
 
बर्फवृष्टी
 
 
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पर्वतीय भागांवर सतत बर्फवृष्टी होत असल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाची लाट आहे. गुलमर्गमध्ये किमान तापमान उणे ७.० अंश, पहलगाममध्ये उणे ६.२ अंश आणि श्रीनगरमध्ये ०.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. बर्फवृष्टीमुळे बंद असलेला बांदीपोरा-गुरेझ रस्ता पुन्हा उघडण्यात आला, तर मुघल रोड अजूनही बंद आहे. भदरवाहमध्ये पर्यटकांची संख्या अचानक वाढली आहे.हिमाचल प्रदेशातही बर्फवृष्टी आणि पावसामुळे थंडीचा जोर वाढला आहे. किन्नौर, लाहौल-स्पिती आणि वरच्या शिमला परिसरातील किमान तापमान गोठणबिंदूपेक्षा खाली गेले आहे. ताबोमध्ये उणे ६.८ अंश, कुकुमसेरीमध्ये उणे ६.२ अंश, कल्पामध्ये उणे ३.० अंश सेल्सिअस नोंदवले गेले.उत्तराखंडमधील केदारनाथसह अनेक भागांवर बर्फवृष्टीमुळे पर्वत पांढऱ्या चादरीत लपेटले गेले आहेत. मुनस्यारीमध्ये दीर्घकाळ न झालेल्या बर्फवृष्टीनंतर काळी दिसणारी हिमालयाची शिखरे पुन्हा पांढऱ्या बर्फाने सजली आहेत, जे पर्यटकांसाठी आकर्षक दृश्य निर्माण करत आहे.