स्वाती गुव्हाणे नगराध्यक्षपदी आरूढ

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
आर्वी, 
swati-guhane : नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने यांनी आज शनिवार ३ रोजी पदभार स्वीकारला. भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गुल्हाणे व नगरसेवकांची आ. सुमित वानखेडे यांच्या संपर्क कार्यालयातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. रामदेव बाबा मंदिर, गणपती मंदिर, तेलंगशहा बाबा मंदिर येथे दर्शन घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून नगरपालिका कार्यालयात पोहोचली.
 
 
jk
 
 
 
पदग्रहण समारंभाच्या कार्यक्रमाला आ. सुमित वानखेडे, मुख्याधिकारी किरण सुकलवाड, सत्तारूढ पक्षाचे गटनेते संजय थोरात, पंकज वाघमारे, भाजपाचे शहर अध्यक्ष राहुल गोडबोले, राकाँचे दिलीप पोटफोडे, माजी नगराध्यक्ष वसंत गुल्हाने, अ‍ॅड. क्षीतिजा वानखेडे उपस्थित होते.
 
 
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष स्वाती गुल्हाणे यांनी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. नगराध्यक्षपद हे सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाचे ऋण फेडण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन. केवळ हे एक पद नसून माझ्यावर टाकलेली जबाबदारी आहे. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन ही जबाबदारी आपण पार पाडू. शहरातील सर्व नगरसेवकांसोबत नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या समस्येची माहिती घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन त्यांनी दिले.
 
 
आर्वीकरांनी शहराच्या विकासाची जबाबदारी पुन्हा भारतीय जनता पक्षाला दिल्याबद्दल आ. वानखेडे यांनी आर्वीकरांचे आभार मानले. नवनिर्वाचित अध्यक्ष व नगरसेवकांवर जो विश्वास व्यत केल्याबद्दल सर्वांनी एकत्र येऊन शहर स्वच्छ, सुंदर व विकासाभिमुख करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून जनतेची सेवा करेल असा विश्वास व्यत केला.
 
 
माजी नगराध्यक्ष वसंतराव गुल्हाने, पंकज वाघमारे, दिलीप पोटफोडे, अ‍ॅड. क्षीतिजा वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुख्याधिकारी किरण सुकलवाड यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन खडसे यांनी केले. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.