तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
deepak-tamshettiwar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासात काळानुरूप अनेक बदल झाले. सुरुवातीला संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी गुणांची पारख करून बाल, तरुण संघकार्याशी जोडले. त्यांनी व तत्कालीन स्वयंसेवकांनी रक्ताचे पाणी करून संघ वाढवला. सुरुवातीला केवळ काही आयामांमध्ये काम करणाèया संघात डॉक्टरांच्या जन्मशताब्दी वर्षापासून 5 हजार सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून सेवा विभाग प्रारंभ झाला. प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवणाèया संघाने 1994-95 मध्ये प्रचार व संपर्क विभाग सुरू केला. भाऊराव देवरस, दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रयत्नांनी मुलांवर राष्ट्रीयत्वाचे संस्कार होणाèया पुस्तकांची निर्मिती सुरू झाली. अटलबिहारी वाजपेयींसारख्या दिग्गजांनी पत्रकारितेतून संघ विचार पोहोचवला. अनेक जागरण पत्रके प्रारंभ झाली. या सर्वांचा उद्देश राष्ट्रहिताचे साहित्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हाच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार यांनी केले.
यवतमाळच्या अवधूतवाडीतील बाबासाहेब आपटे स्मारक भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर जिल्हा संघचालक विलास देशमुख व ज्येष्ठ संपादक राहुल एकबोटे उपस्थित होते. प्रारंभी प्रचार विभागाच्या ‘संस्कृती’ साहित्य विक्री केंद्राचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात विदर्भ हुंकारचे स्तंभलेखक म्हणून विवेक कवठेकर, डॉ. सतपाल सोवळे व स्मिता भोईटे यांचा सत्कार करण्यात आला. संस्कृती संवर्धक मंडळाचे हितेश शेठ व प्रदीप खराटे, प्रचार केंद्र सांभाळणारे प्रभाकर भाकरे यांचाही गौरव करण्यात आला.
दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनानंतर नगर प्रचारप्रमुख संकल्प डांगोरे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. यावेळी मंचावरील अतिथींच्या हस्ते विदर्भ हुंकारने संघशताब्दीनिमित्त तयार केलेल्या ‘समर्पणाचा शतकोत्सव’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. संचालन राम साकळे व माणिक पांडे यांनी केले. आदित्य देशपांडे यांनी वैयक्तीक गीत सादर केले.
प्रा. डॉ. राहुल एकबोटे यांनी याप्रसंगी बोलताना विदर्भ हुंकारच्या विशेषांक प्रकाशनास निमंत्रण हा स्वदेश साप्ताहिकाचा सन्मान असल्याचे म्हटले. बाळ सज्जनवार यांनी सर्वांचे आभार मानले. यवतमाळातील संघ व अन्य क्षेत्रातील पदाधिकारी, स्वयंसेवक व नागरिक बंधू भगिनींची मोठी उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.