वीजबिल वसुलीचा अभियंत्यांवर ताण

सहायक अभियंत्याला निलंबनाचा झटका

    दिनांक :03-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
electricity-bill-collection : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीज बिलाची थकीत वसुली करण्यासाठी कडक पावले उचलायला सुरवात केली. मात्र यामुळे अभियंत्यांवर थकीत बिल वसुलीसाठी मोठा ताण वाढला आहे. त्याच कारणातून संबंधित सहाय्यक अभियंत्याला थेट निलंबनाचा ‘शॉक’ महावितरणने दिल्याने अभियंत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
 
 
 
ytl
 
 
महावितरणच्या कामाची पुनर्रचना होऊन जेमतेम दोन महिने झाली आहे. कर्मचाèयांना कामाचा ताण कमी आणि कामकाजात सुसूत्रता यावी असा हेतू या पुनर्रचनेमागे होता. प्रायोगिक तत्त्वावर ही पुनर्रचना असताना अधीक्षक अभियंत्यांनी थकीत विज बिल वसुलीत मागे राहिल्याचा ठपका ठेवत. बाभुळगाव उपविभागातील सहायक अभियंता अमित ढोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
 
 
ही कारवाई वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांमध्ये धडकी भरविणारी मानली जात आहे. अमित ढोरे यांच्यावरील निलंबन आदेश अन्यायकारक आहे, असा आरोप एसईए या संघटनेने केला आहे. निलंबित अमित ढोरे हे सहायक अभियंता वसूली या पदावर कार्यरत असून पुनर्रचनेनुसार कार्यभार सांभाळत होते. अधीक्षक अभियंता यांनी आदेशित केल्यावरून त्यांचे निलंबन आदेश काढण्यात आले.
 
 
ही बाब कोणत्याही प्रकारे संयुक्तीक नसून प्रशासनाने एसईए सभासद यांच्यावर अन्यायकारक घात केल्याचे दिसून येत आहे. मुख्य कार्यालयाच्या आदेशानुसार पुनर्रचना ही सध्या प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून सर्व बाबींचा विचार करून पुनर्रचनेमध्ये सुधार करण्यात येईल. ती लागू करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.
 
 
संबंधित कालावधीत कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाèयावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही, असे आदेश देण्यात आले होते. तरीही वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने अभियंता अमित ढोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई अतिशय चुकीची व अन्यायकारक असल्याचे एसइएने म्हटले आहे. हे निलंबन त्वरित रद्द करून योग्य न्याय द्यावा अन्यथा संघटनेस नाईलाजाने टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा देखील एसईएने दिला आहे.
 
वसुलीदरम्यान सहायक अभियंत्यास हृदयाघात
 
 
भरमसाठ वीज बील तसेच अन्य कारणांमुळे ग्राहक वीज बिल थकीत ठेवतात. अनेक गावांमध्ये वसुली पथकासोबत भांडणे होतात. त्यामुळे थकित वीजबिलांचा आकडा मोठा झाला आहे. वसुली नसेल तर अभियंत्यांच्या पगारातून देखील कपात होत आहे. स्वाभाविकच याचा मोठा ताण निर्माण झाल्याने अभियंत्यांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. अलीबाग उपविभागात विज बिल वसुली दरम्यान एका सहायक अभियंत्याला अती ताणामुळे हृदयाघाताने प्राण गमवावे लागले. काही दिवसांपूर्वीची ही घटना, त्यातच आता निलंबनाची कारवाई यामुळे करावे तरी काय, या विवंचनेत राज्यभरातील अभियंते सापडले आहेत.