परसोडा ग्रामपंचायतचे कार्य कौतुकास्पद : युवराज मेहेत्रे

ठिबक सिंचनाद्वारे स्मशानभूमीत वृक्षारोपण करणारी पहिली ग्रामपंचायत

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा आर्णी,
Parsoda Gram Panchayat, तालुक्यातील मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेतील गावांची पाहणी करण्याकरिता जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराज मेहत्रे परसोडा येथे आले असता ग्रामपंचायतद्वारे ठिबक सिंचन करून स्मशानभूमीत वृक्षारोपण उपक्रमाचे कौतुक केले. तसेच परसोडा ग्रामपंचायतचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
 

 Parsoda Gram Panchayat 
नवीन वर्षाचे औचित्य साधून परसोडा ग्रामपंचायतद्वारा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष संगोपन करण्याकरिता ठिबक सिंचनाचा वापर केलेल्या कार्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराज मेहत्रे व उपस्थितांनी कौतुक केले. यावेळी आर्णी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश खारोडे, विस्तार अधिकारी इंगोले, विस्तार अधिकारी ठाकरे, जिपचे योजना समन्वयक कुळकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर वृक्षारोपण उपक्रमात सरपंच प्रा. स्वप्ना अतुल देशमुख, उपसरपंच सुनंदा पत्रे, माजी सरपंच अतुल देशमुख, मुख्याध्यापक बाबाराव वानखडे, विलास वेट्टी, अरुण देशमुख, ज्ञानेश्वर राठोड, मंगला चौधरी, अजाबराव पत्रे, रमेश कोल्हे, फुलसिंग नाईक, राजू देशमुख, गजानन शेळके, शंकर कोल्हे, विनोद पत्रे, कैलास जाधव, स्वप्नील राठोड, नारायण सोळंके, आदित्य देशमुख, राम कोल्हे, स्वाती पत्रे, आशा सोळंके, राजश्री कोल्हे, सविता जाधव, कल्पना कुडवे यांनी परिश्रम घेतले.