मुंबई
Maharashtra weather update मुंबई आणि राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांत हवामानात झपाट्याने बदल जाणवत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाच्या सरींनी हजेरी लावली, तर उत्तरेकडील भागांत शीत प्रवाह आणि दक्षिणेकडील ढगाळ वातावरणामुळे तापमानात बदल दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे की, आगामी काही दिवसांत किमान तापमान तुलनेने अधिक राहणार असून, कडाक्याची थंडी नाही; तरीही पहाटे आणि रात्री गारठा जाणवेल.
गेल्या दोन दिवसांपासून Maharashtra weather update राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण दिसून आले असून, याचा थेट परिणाम किमान तापमानावर झाला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ नोंदवण्यात आली असून सध्या राज्यातील बहुतेक भागांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.कोकणात ४ जानेवारी रोजी हवामान मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता असून मुंबईत कमाल तापमान सुमारे ३२ अंश आणि किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. सकाळी आणि रात्री थोडीशी गार हवा जाणवेल, पण नागरिकांना हवामानाचा सामना करण्यास गंभीर अडचण येणार नाही.
पश्चिम महाराष्ट्रात हिवाळ्याची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. पुण्यात कमाल तापमान ३१ अंश आणि किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळच्या वेळेत धुक्याचं प्रमाण जास्त राहणार असल्याने वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. सोलापूरमध्ये राज्यातील उच्चांकी कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे.
काय म्हणतो अंदाज?
मराठवाड्यात मुख्यतः कोरडे Maharashtra weather update वातावरण राहणार असून आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान १५ अंश आणि कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील नाशिक, नागपूरसारख्या शहरांतही अशीच हवामानस्थिती राहणार आहे.
तापमान वाढले असली Maharashtra weather update तरी अचानक हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा IMD ने दिला आहे. नागरिकांनी पहाटे आणि रात्री गरम कपडे वापरण्याचे आवाहन केले आहे.राज्यातील हवामानाबरोबरच मुंबईतील वायू प्रदूषण हा सध्या गंभीर प्रश्न बनला आहे. काल रात्री शहरभर धूळच्या थरांमुळे आकाशात काहीही स्पष्ट दिसत नव्हते. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वास घेण्यात त्रास, गळ्यात दुखणे, खोकला तसेच सर्दी-ताप यांसारख्या समस्या भासू लागल्या आहेत. हवामान विभागाने नागरिकांना घराबाहेर मास्क घालून फिरण्याचा सल्ला दिला असून, श्वसन आजार असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचेही अधोरेखित केले आहे.दिल्ली-एनसीआरमध्येही तापमानात घट सुरू असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. अंदाजानुसार राजधानीतील तापमान ५ जानेवारीपर्यंत आणखी कमी होण्याची शक्यता आहे. यलो अलर्ट देण्यात अल आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता आहे, तर सकाळच्या वेळेत दाट धुके पडण्याचीही शक्यता आहे.हवामानातील सतत बदल आणि वाढती प्रदूषणाची पातळी नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याने, आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी स्वतःचे संरक्षण Maharashtra weather update करणे आवश्यक आहे.