भालेवाडी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा पुढाकार

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
मारेगाव,
 
Bhalewadi village, तालुक्यातील भालेवाडी येथे लोकसहभागातून वनराई बंधाèयाचे बांधकाम सुरू असून, या उपक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. शेती परिसरातील पाण्याची पातळी वाढवून शेती उत्पादनात वाढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.सहायक कृषी अधिकारी प्रवीण कचाटे यांच्या मार्गदर्शनात गावातील नागरिक व शेतकèयांच्या सहभागातून बंधाèयाचे काम प्रगतीपथावर आहे. या वनराई बंधाèयामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून, त्याचा थेट लाभ शेतकèयांना मिळणार आहे.
 

Bhalewadi village 
यावेळी भालेवाडी येथील शेतकरी रस्से यांनी, वनराई बंधाèयामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारेल. परिणामी पिकांचे उत्पादन वाढून शेतकèयांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असे सांगितले.तालुका कृषी अधिकारी दीपाली खवले यांनी, पाण्याची पातळी वाढल्यास पिकांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होतो. जलसंधारणाच्या अशा उपक्रमांमुळे शेतीत आमूलाग्र बदल घडू शकतो. शेतकèयांनी पुढे येऊन अशा कामांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
 
लोकसहभागातून साकार होत असलेला हा वनराई बंधारा भालेवाडी परिसरातील शेतीसाठी वरदान ठरणार असून, जलसंधारणाच्या दृष्टीने हा उपक्रम आदर्श ठरत आहे.