बोर व्याघ्र प्रशासनाची उद्यापासून विशेष मोहीम

*व्याघ्र प्रगणनेचा फेज-१; अ‍ॅपद्वारे होते नोंदी

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
वर्धा, 
bor-tiger-reserve-administration : अखिल भारतीय व्याघ्र प्रगणना २०२६ अंतर्गत जिल्ह्यात फेज-१ व फेज-३ जिल्ह्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. प्रादेशिक वनविभागाने फेज-१ करिता २२ ते २८ डिसेंबर या काळात विशेष मोहीम राबवून वन्यजीवांच्या साईन आदी नोंदी ‘एमएसटीआरआयपीईएस इकोलॉजिकल’ या अ‍ॅपद्वारे घेण्यात आल्या तर ५ ते १४ जानेवारी या काळात बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासन आपल्या कार्यक्षेत्रात विशेष मोहीम संबंधित अ‍ॅपद्वारे विविध नोंदी घेणार आहे.
 
 
 
K
 
 
 
बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासन ५ ते १४ जानेवारी या काळात व्याघ्र प्रगणनेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण कामगिरी करणार आहे. ५ ते ७ जानेवारी या तीन दिवसांत बोर व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी त्याच्या कार्यक्षेत्रात प्रत्येक दिवशी ५ किमी असे एकूण १५ किमी अंतर पायी चालून वाघ, बिबट व इतर मांसभक्षी वन्यप्राण्यांचे साईन आदींच्या नोंदी प्रपत्र-१ आणि प्रश्नावली भरून घेणार आहेत.
 
 
ट्रान्सेट लाईन होणार सर्व्हे
 
 
बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासन ८ ते १४ जानेवारी या काळात खुरे असलेल्या वन्यप्राण्यांची नोंदी घेण्यासाठी ट्रान्सेट लाईन सर्वेक्षण करणार आहे. शिवाय विविध आकाराच्या खंडात वनस्पतीची माहिती गोळा करणार आहे. शिवाय मानवी हस्तक्षेपाची माहिती, मोठ्या पक्ष्यांच्या नोंदी, भु-पृष्ठाकावरील आच्छादन नोंदीही घेतल्या जाणार आहे.
 
 
५३ वनरक्षक करणार सर्व्हेक्षण
 
 
मांस-तृणभक्षी वन्य प्राण्यांची माहिती जमा करण्यासाठी बोर व्याघ्र प्रकल्पात सेवा देणारे ५३ वनरक्षक, वनमजूर व इतर अधिकारी सोमवार ५ जानेवारीपासून विशेष मोहीम राबविणार आहे. सर्वेक्षणाअंती प्राप्त होणारी माहिती व्याघ्र प्रगणनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे.