चंद्रपूर,
devendra-fadnaviss-roadshow विदर्भ-मराठवाड्याचे आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राज्यातील महानगर पालिका निवडणुकीचा नारळ फोडला. मातेच्या दर्शनाने भाजपा-सेना युतीचा विजय होणारच या अदम्य विश्वासाचे बळ घेऊन त्यांनी रविवारी सकाळी चंद्रपूरच्या ‘रोड शो’ला सुरूवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील नगरांसाठी दिलेल्या 50 कोटी रूपयांतून चंद्रपूरला सढळ मदत केली जाईल, अशी घोषणा त्यांनी शेवटी सभेत केली.
सकाळी 11 वाजता वेकोलि मैदानावर मुख्यमंत्र्यांचे‘हेलिकॅप्टर’ उतरले. तेथून ते थेट येथील माता महाकालीच्या मंदिरात पोहोचले. त्यानंतर नगरातून अतिशय भव्य असा ‘रोड शो’ झाला. शेवटी स्थानिक जटपुरा द्वारावर झालेल्या सभेत फडणवीस म्हणाले, येत्या काळात चंद्रपूर महानगराला आधुनिक शहर बनवू. पण त्यासाठी 15 ला जनतेने आमची काळजी घ्यावी. 16 जानेवारीपासून पुढील पाच वर्ष आम्ही जनतेची काळजी घेऊ. devendra-fadnaviss-roadshow यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक उईके, माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर, आ. किशोर जोरगेवार, आ. किर्तीकुमार भांगडिया, आ. करण देवतळे, शिवसेनेचे नेते किरण पांडव प्रभृती उपस्थित होते.
‘मतभेद होऊ शकतात, पण मनभेद नाही’
चंद्रपुरात एखाद दुसर्या गोष्टीवर नेत्यांमध्ये मतभेद होऊ शकतात, पण मनभेद नाही. या महानगराच्या विकासात मुनंटीवार, अहिर, जोरगेवार यांचा मोठा वाटा आहे. भाजपाव्यतरिक्त अन्य कुणी येथे विकास केला हे त्यांना दाखवताच येत नाही. प्रचारासाठी दिवस कमी आहेत. सगळीकडे पोहचायचे आहे आणि म्हणून वेगवेगळ्या पध्दतीने आम्ही ‘360 अंशाने’ प्रचार करतो आहोत. युतीधर्म पाळताना मंत्रीपदाच्या 20 जागा आम्हाला बाहेर द्याव्या लागल्या. devendra-fadnaviss-roads त्यामुळे आमच्या काही नेत्यांवर अन्याय झाले. कुणाला तरी त्याग करावा लागतो. पण चंद्रपूरच्या विकासाकडे आमचे पूर्ण लक्ष आहे, असे फडणवीस पत्रकारांशी संवाद साधताना बोलले.