ऐतिहासिक ! मराठी चित्रपटसृष्टीचा अभिमान 'दशावतार ऑस्करच्या यादीत'

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Dashavatar Marathi film 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणाऱ्या चित्रपट ‘दशावतार’ला 98 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या मुख्य स्पर्धेत (Main open film category – contention list) अधिकृतपणे निवडण्यात आले आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या बाबुली मिस्त्रीच्या भूमिकेचं ताजेतवाने कौतुक झालं असून, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करून मराठी सिनेमाची गरिमा वाढवली आहे.
 

 Dashavatar Marathi film, Oscar 2025 contention list 
‘दशावतार’चे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. त्यांनी लिहिले, “कष्टांचं, प्रामाणिकपणाचं, मोठं स्वप्नं पाहण्याचं चीज होतंच… फक्त कामावर विश्वास हवा, खाली मान घालून कष्ट करत राहण्याची चिकाटी हवी, पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची जिद्द हवी आणि विश्वास ठेवणाऱ्या माणसांची खंबीर साथ हवी!”सुबोध खानोलकर पुढे म्हणाले की, “आज ‘दशावतार’ला ऑस्करच्या मुख्य स्पर्धेत निवडल्याचा मेल आला आणि गेल्या अनेक वर्षांतील मेहनतीची दखल घेतल्याचा आनंद मिळाला. हे समाधान फक्त ‘दशावतार’ निवडला गेला म्हणून नाही, तर मराठी चित्रपट जागतिक स्तरावर आपली ताकद सिद्ध करू शकतो हे दाखवण्याचा आहे.”
 
 
जगभरातील हजारो Dashavatar Marathi film  चित्रपटांमधून निवडलेले 150+ चित्रपटांच्या यादीतून ‘दशावतार’ हा एकमेव मराठी चित्रपट ठरला आहे. तसेच, हा चित्रपट Academy Screening Room मध्ये दाखवला जाणारा पहिलाच मराठी चित्रपट आहे, हे देखील इतिहासिक मानले जात आहे. खानोलकर म्हणाले की, “जिंकणं हरणं नंतरची गोष्ट आहे, पण मुख्य जागतिक प्रवाहात मराठी चित्रपटाची दखल घेतली जाणं हे प्रचंड अभिमानास्पद आहे. ही फक्त सुरुवात आहे; आम्ही सातत्याने चांगलं काहीतरी तयार करण्याचा आणि ते जगासमोर आणून मराठीची मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू!”चित्रपटात दिलीप प्रभावळकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदुलकर, महेश मांजरेकर आणि अभिनय बेर्डे यांसारख्या प्रमुख कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. कोकणच्या पंरपरेवर आधारित या कथानकाने प्रेक्षकांचा मन जिंकले असून, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर प्रभावी भाष्य केल्याचे चित्रपट समीक्षकांनीही मान्य केले आहे.मराठी सिनेमासाठी हा क्षण ऐतिहासिक मानला जात आहे. ‘दशावतार’च्या ऑस्कर प्रवासामुळे मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक ओळख मिळण्याची दालनं उघडली आहेत.