गांधीनगर,
gandhinagar-indore-contaminated-water मध्य प्रदेशातील इंदूरनंतर आता गुजरातच्या गांधीनगरमध्येही दूषित पाण्याचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. दूषित पाणी पिल्यामुळे शेकडो नागरिक टायफॉइडग्रस्त झाले असून, सध्या १०४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. राजधानी गांधीनगरमध्येही इंदूरसारखीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
वृत्तानुसार, सेक्टर २४, २६, २८ आणि आदिवाडा परिसरात टायफॉइडच्या रुग्णांची नोंद झाली आहे. दूषित पाणी पिल्यामुळे अनेक लोक आजारी पडले असून, आरोग्य विभागाच्या पथकांनी ताबडतोब काम सुरू केले आहे. घरोघरी सर्वेक्षण सुरू असून पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनची दुरुस्ती देखील सुरु आहे. इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे पंधरा जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे २,८०० लोक आजारी पडले होते. gandhinagar-indore-contaminated-water गांधीनगरमध्येही ताप, पोटदुखी आणि उलट्या यासारख्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने अंदाजे ४० पथके तयार केली आहेत आणि रुग्णालयात आपत्कालीन वैद्यकीय कर्मचारी तैनात केले आहेत.
उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी गांधीनगर सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. gandhinagar-indore-contaminated-water स्थानिक पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात सुमारे १० गळती आढळल्या असून, दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. गांधीनगरमध्ये दूषित पाणी पिल्यामुळे निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन सतर्क आहे आणि नागरिकांनाही पाण्याच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.