'ब्यूटी विद ब्रेन'! अभिनेत्री, पायलट आणि समाजसेविका?

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Gul Panag बॉलिवूडच्या बहुप्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्री गुल पनाग आज आपला ४७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. भारतीय सैन्यातील लेफ्टनंट जनरल असलेल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी शिक्षण घेतलेली गुल पनाग ही केवळ अभिनय क्षेत्रातच नव्हे तर शिक्षण, सामाजिक कार्य आणि वैयक्तिक आवडीनिवडींमध्येही प्रख्यात आहे. गणितात बॅचलर पदवी आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केलेल्या गुल पनागला अभिनय, मॉडेलिंग, पायलटिंग आणि मोटारसायकल चालवणे या सर्वांमध्ये गती आहे.
 

Gul Panag 
गुल पनागने १९९९ Gul Panag मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला. या विजयाने तिला तातडीने अभिनय क्षेत्रात प्रवेश मिळवून दिला; मात्र, तिने एका जुन्या मुलाखतीत खुलासा केला की, मिस इंडियाचा किताब तिला गंभीर भूमिकांमध्ये कास्ट होण्यापासून रोखत होता. “चित्रपट निर्माते मला गंभीर भूमिकांमध्ये घेण्यास घाबरत होते आणि मला फक्त ग्लॅमरस भूमिकांमध्ये पाहायचे होते. माझ्यासाठी हा किताब अडथळा ठरला,” असे त्यांनी म्हटले.
 
 
अभिनय क्षेत्रात Gul Panag गुल पनागने २००३ मध्ये “धूप” चित्रपटातून पदार्पण केले. “झोर,” “डोर,” आणि “निरमा सिक्स फीट अंडर” यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपली अभिनय क्षमता सिद्ध केली. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त, गुलने पंजाबी चित्रपट आणि वेब सिरीजमध्येही काम केले आहे. २००७ मध्ये झी सिने क्रिटिक्स पुरस्कार जिंकला आणि २०२० मध्ये पाताल सिरीजसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर ओटीटी पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले.अभिनयाव्यतिरिक्त, गुल पनाग व्यावसायिक पायलट असून विमान उडवणे हे तिचे आवडते छंद आहे. ती मोटारसायकल चालवण्यातही निपुण आहे. तसेच, ती सामाजिक कार्यात सक्रिय असून, कर्नल शमशेर सिंग फाउंडेशन चालवते, वोक्हार्ट फाउंडेशनच्या सल्लागार मंडळावर काम करते आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन चळवळ तसेच दिल्ली हाफ मॅरेथॉनसारख्या उपक्रमांमध्ये भाग घेतली आहे.गुल पनागने चंदीगडमध्ये एअरलाइन पायलट ऋषी अटारी यांच्यासोबत १३ मार्च २०११ रोजी पारंपरिक पंजाबी शीख समारंभात लग्न केले. या जोडप्याला निहाल नावाचा एक मुलगा आहे. सोशल मीडियावर क्वचितच सक्रिय असणारी गुल तिच्या कुटुंबीयांसह काही खास क्षण शेअर करत राहते.
 
 
आज गुल पनाग फक्त एक अभिनेत्री म्हणून नव्हे, तर समाजसेविका, पायलट, मॉडेल आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणूनही ओळखली जाते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त चाहते आणि सहकारी त्यांच्या यशस्वी कारकिर्दीस शुभेच्छा देत आहेत.