वर्धा,
Hindi University 50th anniversary, सन १९७५ मध्ये नागपूर येथे विश्व हिंदी संमेलन पार पडले होते. या संमेलनात हिंदी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी हिंदी विद्यापीठाची संकल्पना मांडण्यात आली आणि १९९६ मध्ये संसदेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आज हिंदी विद्यापिठाच्या संकल्पनेला ५० पूर्ण होणार असून ७ ते १० जानेवारी दरम्यान विद्यापीठाचा २९ वा स्थापनोत्सव साजरा केला जाणार आहे. चार दिवसीय स्थापनोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आल्याची माहिती कुलगुरू प्रा. कुमूद शर्मा यांनी आज रविवार ४ रोजी नागार्जुन अतिथीगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
कुलगुरू प्रा. शर्मा पुढे म्हणाल्या की, ९ महिन्यांपूर्वी ७ मार्च २०२५ रोजी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा म्हणून जबाबदारी सांभाळली. या विद्यापीठात महिला कुलगुरू म्हणून आपली पहिली नियुती आहे. रुजू झाल्यापासून विद्यार्थ्यांना शिक्षणासह विविध कौशल्याचे ज्ञान मिळावे यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. विकसित भारतात युवाशतीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे येथून बाहेर पडलेला विद्यार्थी कला कौशल्यपूर्ण असावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यत केली.हिंदी विश्व विद्यापिठाच्या स्थापनादिनानिमित्त ७ ते १० जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ८ रोजी ध्वजारोहन होईल. ११ वाजता स्थापनादिनाचा मुख्य कार्यक्रम होईल. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आभासी उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. कुमूद शर्मा राहतील तर विशेष अतिथी म्हणून केंद्रीय माजी शिक्षामंत्री डॉ. रमेश पोखरियाल, कार्य परिषदेचे सदस्य प्रा. सुरेंद्र दुबे, ज्येष्ठ पत्रकार अनंत सारस्वत उपस्थित राहतील.
पुस्तक संस्कृतीला पुढे नेण्यासाठी विद्यापिठाच्या बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवनाच्या प्रांगणात ७ ते १० जानेवारीपर्यंत राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे आयोजन करण्यात आले. पुस्तक मेळ्याचे उद्घाटन ७ रोजी प्रसिद्ध लेखीका डॉ. क्षमा कौल यांच्या हस्ते होईल. यावेळी लेखक डॉ. भूषण भावे उपस्थित राहतील. ८ ते १० जानेवारीपर्यंत ‘भारतीय साहित्य मे एकात्मता’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त मेजर ध्यानचंद क्रीडांगणावर सायंकाळी ६ वाजता डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्यूकेशन, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथील कलाकार मल्लखांबाचे प्रदर्शन करतील. सांस्कृतिक कार्यक्रमांसह १० रोजी फूड
फेस्टिवलचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू प्रा. कुमूद शर्मा यांनी यावेळी दिली.
पत्रकार परिषदेला कुलसचिव कादर नवाज, मीडिया समितीच्या संयोजक डॉ. रेणू कुमारी, जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे, डॉ. अमित विश्वास, डॉ. संदीप वर्मा उपस्थित होते.