नोएडा,
indian-oil-official-committed-suicide-in-noida नोएडामधील सेक्टर-१०४ येथील एका उंच इमारतीतील सोसायटीत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. १७व्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. ही घटना सेक्टर-३९ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

मृत अधिकाऱ्याचे नाव अनिल गर्ग असल्याची ओळख पटली असून ते मूळचे कानपूरचे रहिवासी होते. सध्या ते नोएडातील एटीएस वन हेमलेट या सोसायटीत वास्तव्यास होते. वय ५५ वर्षे असलेले अनिल गर्ग इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदावर कार्यरत होते. indian-oil-official-committed-suicide-in-noida शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही मिळाली आहे. या चिठ्ठीत त्यांनी आयुष्यातील ताणतणावाचा उल्लेख करत आपण जीवनाशी त्रस्त असल्याचे नमूद केले असून, कुटुंबावर आपले खूप प्रेम असल्याचेही लिहिले आहे. पोलिस सध्या या चिठ्ठीच्या आधारे तसेच इतर सर्व शक्यता लक्षात घेऊन सखोल तपास करत आहेत. कुटुंबीयांचे जबाबही नोंदवले जात आहेत.
अनिल गर्ग हे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या दिल्ली कार्यालयात कार्यरत होते. ते पत्नी मयुरी गर्ग यांच्यासह नोएडामध्ये राहत होते. त्यांना एक मुलगा असून तो सध्या मुंबईत नोकरी करतो. indian-oil-official-committed-suicide-in-noida घटनेची माहिती त्याला देण्यात आली असून तो मुंबईहून नोएडाकडे रवाना झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळी सुमारे १०.२० वाजता अनिल गर्ग यांनी पत्नीशी बोलल्यानंतर मोबाइलवर कॉल करत असताना बाल्कनीकडे गेले होते. घरात नेटवर्क नीट मिळत नसल्याने ते बाहेर आले होते. त्याच वेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. सोसायटीतील रहिवाशांनी त्यांना खाली पडलेले पाहून तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.