पाटील झाले रोमॅंटिक , म्हणाले ‘I Love You’ सर्वांसोबत!'

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
जळगाव,
gulabrao patil राज्यातील महापालिका निवडणुकीत महायुतीतल्या नैसर्गिक युतीच्या दावा करणाऱ्या पक्षांमध्ये युती खूपच मर्यादित ठिकाणीच दिसून आली, तर बहुतेक ठिकाणी दोन्ही पक्ष आमने-सामने उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती होणार की नाही, याबाबत चर्चेला गती मिळाली आहे.
 

gulabrao patil 
याच संदर्भात शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाचोरा येथे आयोजित एका कार्यक्रमात महत्वाचे वक्तव्य केले. ते म्हणाले, “मला बोलता येत नाही, मला प्रॉब्लेम आहे, मी सरकारमध्ये आहे. मला सर्वांसोबत ‘आय लव्ह यु’ करावं लागतं, माझी जबाबदारी सांभाळून मला बोलावं लागतं.” त्यांनी हसत म्हणाले की, “किशोर पाटील यांना सूट आहे, म्हणून ते दंड थोपटत आहेत. पोलीस असल्यामुळे त्यांचे वर्तन साधारण असते. नशिबाने तेही आमदार झाले आहेत.”
गुलाबराव पाटील यांनी पुढे सांगितले की, “धरणगावची सत्ता माझ्याकडे २५ वर्षांपासून होती; ती गेली, पण परत येईल. निवडणुकीनंतर काही नगरसेवकांचे कठीण होणे सामान्य आहे; दोन मोबाईल, चार माणसे, आणि हवा असते. नगरसेवकांना हात जोडून विनंती करतो की आलेल्याशी गोड बोला, काम हो अथवा ना हो, असा सल्ला दिला.”
 
 
शिंदे सेनेचे नेते किशोर gulabrao patil  पाटील यांना विरोधकांसोबत वाद न करता लोकशाही मान्य करावी लागेल, असेही गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे म्हटले की, “आपण निवडून आलो आहोत, आता आपण सर्वांचे आहोत. विरोधक जरी आपल्याकडे आले तरी त्यांना पाणी पाजा, ही आपली लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक संपली की सर्व विरोध संपतात. आमदारकीची निवडणूक अजून खूप लांब आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत किशोर पाटील भाजपशी युती करणार नाही, हे मला माहित आहे.”
 
 
दरम्यान, नगरपरिषद gulabrao patil  निवडणुकीत शिवसेनेचे किशोर पाटील यांनी युती तोडत स्वतंत्र लढा दिला होता. पाचोरा आणि भडगाव येथे दोन्ही पक्षांचा भाजपशी थेट सामना झाला होता आणि दोन्हीकडे शिवसेनेने सत्ता मिळवली. या पार्श्वभूमीवर आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत युती होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत.कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या राजकीय अनुभवातील तीस वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला. त्यांनी म्हटले, “नगरसेवक झाला की तो ऐकत नाही, माझा कार्यक्रम तसाच झाला होता. पैसे नव्हते म्हणून नगरसेवकांना घेऊन झुरखेड्याला पळून गेलो होतो. सोळा दिवस आम्ही नगरसेवकांना श्रीमंत कार्यकर्त्याच्या राजवाड्यात ठेवले. त्यानंतर धरणगावचा पहिला नगराध्यक्ष बसवला. ज्या नेत्याचे नगरसेवक चांगले असतात, त्या नेत्याला शहरात शंभर टक्के मताधिक्य मिळते. नगरसेवकांना हात जोडून विनंती करतो की किशोर पाटील यांना शहरातून १५ हजार मताधिक्य मिळेल, यासाठी काम करा.”राजकीय तज्ज्ञांच्या मते, गुलाबराव पाटीलांचे वक्तव्य आगामी निवडणुकांमध्ये पक्षांच्या रणनीतीवर प्रभाव टाकू शकते. जळगाव जिल्ह्यात शिवसेना-भाजप युतीची शक्यता धुसर असल्याचे संकेत या वक्तव्यानंतर अधिक स्पष्ट झाले आहेत.