वर्धा श्रमिक पत्रकार संघ; चौथा स्तंभ पुरस्कारांचे नऊ मानकरी

* मंगळवारी पत्रकारदिनी होणार प्रदान *तभाचे हिंगणघाट शहर प्रतिनिधी रमेश लोंढे यांची निवड

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
वर्धा, 
ramesh-londhe : वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकारदिनी दिल्या जाणार्‍या चौथा स्तंभ पुरस्कार मानकर्‍यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवार, ६ रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक दादाजी धुनिवाले देवस्थान सभागृहात आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावर्षी हिंगणघाट येथील तरुण भारतचे शहर प्रतिनिधी रमेश लोंढे यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे.तभाच्या प्रतिनिधींना पुरस्कृत करण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे, हे उल्लेखनिय!
 
 
 
WARDHA
 
 
 
स्व. वामनराव दिवे ट्रस्टचा ‘सिंचन व शेती क्षेत्र पुरस्कार’ सुरेश पाटील (हळदगाव) यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ पत्रकार सुरेश धोपटे स्मृती पत्रकारिता पुरस्कार मनोज भोयर (मुंबई), बबीबाई नंदकिशोर जावंधिया स्मृती पत्रकारिता पुरस्कार वैष्णवी नवले (साहूर) या विद्यार्थिनीला प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकार प्रा. डॉ. प्रवीण वानखेडे स्मृती पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सूर्यप्रकाश भट्टड (आर्वी) आणि प्रवीण होणाडे यांना, प्रशांत हेलोंडे स्मृती पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व तरुण भारतचे हिंगणघाट शहर प्रतिनिधी रमेश लोंढे तर मनोज मुते स्मृती पत्रकारिता पुरस्कार वृत्तवाहिनीचे पत्रकार पराग ढोबळे (नागपूर) यांना, आदर्श पालक सन्मान पुरस्कार वर्धा येथील डॉ. राजेंद्र व डॉ. मिना डागा (आयपीएस डॉ. अभय डागा यांचे पालक) यांना, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेता सन्मान पुरस्कार मनोहर मुडके (वर्धा) यांना प्रदान करण्यात येणार आहे. या सर्व पुरस्कारांचे स्वरुप रोख रक्कम, शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त वर्धेकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे व कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.