विलास नवघरे
समुद्रपूर,
Sameer Kunawar तालुक्यातील गिरड खुर्सापार परिसरात गेल्या १२ महिन्यापासून वास्तव्यास असलेल्या एक वाघीण तिन पिल्ले आणि एक वाघा अशा ५ वाघांनी शेतकरी शेतमजूर व नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली आहे.आमदार समिर कुणावार यांच्या सततच्या पाठपुरावाने आधी एका वाघाला तर आता वाघीण व तिच्या तिन्ही पिल्याना जेरबंद करण्याचा आदेश वनविभागाला प्राप्त झाली असून आत पाचही वाघ जेरबंद करण्याची जबाबदारी वनविभागाकडे आहे. आतापर्यंत या वाघांनी कोणत्याही मनुष्याला इचा पोहचवली नसली तरी शेकडो पाळीव जनावरांना ठार केले आहे.

त्यातील एका वाघाला Sameer Kunawar जेरबंद करण्याची परवानगी ३ महिन्यापुर्वीच मिळाली आहे. हा वाघाला वन विभागाकडून या वाघा जेरबंद करण्यासाठी युध्द पातळीवर पर्यंत सुरू आहे. तिन महिने लोटून तरी देखील हा वाघ वनविभागाच्या हाती अद्याप लागला नाही हा वाघ इतका चतूर आहे की त्याला पकडण्याची भनक लागताच तो नागपूर जिल्ह्यातील जंगलात पलायन करीत आहे.यामुळे नागपूर व वर्धा वनविभागाला सयुक्त मिशन राबविण्याचे आदेश मिळाले होते. आमदार समिर कुणावार हे सुरुवातीपासूनच या वांघाच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून असुन त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी फोनवर चर्चा करून वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली होती.तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंगणघाट येथे आले असता त्यांना या ५ वाघांसंबधी अवगत करून पाचही वाघांना तातडीने जेरबंद करण्याचे संबंधितांना निदर्शन देण्याची मागणी निवेदनातून केली होती.तर १० डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान सेमिनरी हिल परीसरातील हरीसिंग सभागृहात वनमंत्री गणेश नाईक, आमदार समिर कुणावार यांच्यासह वनविभाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीत आमदार कुणावार यांनी गिरड परीसरातील वांघाचा मुद्दा उपस्थित करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली होती. ३ महिन्यापासून उपवनसंरक्षक Sameer Kunawar हरबिदर सिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात वाघाला पकडण्यासाठी ५० वर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वाघाच्या मार्गावर असून जंगल परिसरात शेकडो स्ट्राप कॅमेऱ्यासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.२ ड्रोन कॅमेरे सुध्दा रोज जंगल परिसरात घिरट्या घालत आहे. हा वाघ इतका चतूर आहे की त्याला पकडण्याची भनक लागताच तो नागपूर जिल्ह्यातील जंगलात पलायन करीत आहे.यामुळे वर्धा जिल्ह्यातील वाघाला नागपूर हद्दीत पकडण्याचा कायदेशीर पेज निर्माण झाला होता. मात्र आमदार कुणावार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शेवटच्या यावर नागपूर व वर्धा जिल्ह्यातील वनविभागाच्या टिमने सयुक्त कारवाई करण्याचा तोडगा काढण्यात आला होता.दोन्ही टिमचे काम सुरू असताना आता आमदार समिर कुणावार यांच्या पाचही वाघांना जेरबंद करण्याच्या आग्रही मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाने वाघीण व तिच्या तिन्ही पिल्याना जेरबंद करण्याचा आदेश दिला आहे.यामुळे आता वनविभागाच्या टिमचा गिरड खुर्सापार परीसरात दहशत निर्माण करणाऱ्या या पाचही वाघांना जेरबंद करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आमदार समिर कुणावार
गिरड खुर्सापार परीसरात Sameer Kunawar गेल्या वर्षभऱ्यापासुन एक वाघ वाघीण व तिचे तिन पिल्ये यांनी शेतकरी व नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण केली आहे.शेतकरीची अडच लक्षात घेऊन यासंबंधी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन वनमंत्री गणेश नाईक व संबंधित वनविभागाच्या वरीष्ठ अधिकारी बैठक घेऊन या पाचही वाघांना पकडून नेण्याची मागणी लावून धरली माझ्या मागणीची दखल घेऊन आदी एका वाघाला आणि आता वाघीण व तिच्या तिन्ही पिल्याना जेरबंद करण्याचे आदेश वनविभागाला दिले आहे.माझ्या मागीला गांभीर्याने घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश यांचे मनापासून आभार व्यक्त करतो व वनविभागाने आता लवकर ५ हि वाघाणा पडुन घेऊन जावे अशा आशा व्यक्त करतो.