चंद्रपूर,
Lavani dance उत्कृष्ट महिला मंच व सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लावणी नृत्याविष्कार गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियोजन बैठकीचे आयोजन 29 डिसेंबर रोजी वडगाव येथील सोमय्या पॉलिटेक्निक कॉलेज येथे करण्यात आले होते.
महाराष्ट्राची ओळख असलेली लावणी या पारंपरिक नृत्य प्रकारची जगाच्या पाठीवर ओळख निर्माण व्हावी व येणार्या पिढीला याचे महत्त्व आणि जाण असावी या हेतूने उत्कृष्ट महिला मंच तसेच सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांच्या संयुक्त विद्यमाने 1 फेब्रुवारी 2026 रोजी येथील चांदा क्लब मैदान येथे 5 हजार महिला एकाच वेळेस सतत वीस मिनिटे वीस लावण्याचे सादरीकरण करणार असून, याची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद होणार आहे.
त्यासंदर्भात सोमय्या Lavani dance ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे चेअरमन पांडुरंग आंबटकर तसेच उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्ष छबू वैरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीची सुरुवात प्रस्तावनेने झाली. तसेच अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमस्थळी असणारी व्यवस्था, दर्शनीय स्थळाची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, भोजन व निवास व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्था इत्यादी बाबींवर विशेष चर्चा करून नियोजन करण्यात आले.कार्यक्रम दर्शनीय स्थळी (दर्गा मैदान) विविध स्टॉल्स आणि प्रेक्षकांना पाहण्याची व्यवस्था मोठ्या स्क्रीनवर करण्यात आली आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्थादेखील करण्याचे ठरले आहे. कार्यक्रमादरम्यान आरोग्य व्यवस्था तसेच साफसफाई आणि सुरक्षा व्यवस्था इत्यादी विविध बाबींवर चर्चा होऊन सर्व प्रकारचे नियोजन करण्यात आले.