कराकस,
interim-president-in-venezuela अमेरिकेने केलेल्या अचानक कारवाईनंतर अध्यक्ष निकोलस मादुरो यांना बंधक बनवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर व्हेनेझुएलात मोठा राजकीय निर्णय घेण्यात आला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत उपाध्यक्ष डेल्सी रोड्रिग्ज यांची नव्या अंतरिम राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली आहे. मादुरो यांच्या अनुपस्थितीमुळे देशात अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
डेल्सी रोड्रिग्ज या आतापर्यंत व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. देशासमोर उभ्या राहिलेल्या गंभीर परिस्थितीत त्यांनी आता अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. interim-president-in-venezuela अमेरिकेच्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळात मादुरो उपलब्ध नसल्याने सत्ता रिक्त राहू नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हा निर्णय घेतला.
डेल्सी रोड्रिग्ज यांचा जन्म 18 मे 1969 रोजी राजधानी काराकसमध्ये झाला. interim-president-in-venezuela त्यांचे वडील जॉर्ज अँटोनियो रोड्रिग्ज हे डाव्या विचारसरणीचे गुरिल्ला लढवय्ये होते. त्यांनी 1970 च्या दशकात ‘लीगा सोशलिस्टा’ या क्रांतिकारी पक्षाची स्थापना केली होती. डेल्सी रोड्रिग्ज यांनी सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करत आपली ठाम छाप उमटवली आहे.
अध्यक्ष मादुरो हे देखील डेल्सी रोड्रिग्ज यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करत आले आहेत. interim-president-in-venezuela त्यांनी एका भाषणात डेल्सी यांना ‘शेरनी’ असे संबोधले होते. अलीकडेच देशात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर डेल्सी रोड्रिग्ज यांनी अमेरिकेवर तीव्र टीका केली होती. त्यांनी मादुरो यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी करताना स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, व्हेनेझुएला कधीही कोणाच्याही अधिपत्याखाली जाणार नाही. त्यांनी हेही ठामपणे नमूद केले की, देश आपल्या नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. अमेरिकेच्या कारवाईविरोधात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत व्हेनेझुएलाची सार्वभौमता अबाधित राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.