तभा वृत्तसेवा
महागाव,
mahagaon-tiger-terror : महागाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाèया शेनद परिसरात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरूच असून, शनिवारी सकाळी एका गाभण गाईवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. शेतकèयाच्या डोळ्यादेखत झालेल्या या थरारामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शेनद येथील शेतकरी मनोहर धर्मा पवार हे शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास आपली गाभण गाय चारण्यासाठी शेताजवळील जंगलात घेऊन गेले होते. गाय चरत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर झडप घातली. हा भीषण प्रकार पाहून शेतकरी मनोहर पवार पूर्णपणे हादरून गेले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी घराच्या दिशेने धाव घेतली, त्यामुळे सुदैवाने त्यांचा जीव वाचला. मात्र, अवघ्या तीन-चार दिवसांत वासराला जन्म देणाèया या गाईचा वाघाच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाल्याने शेतकèयाचे मोठे नुकसान झाले आहे.
महागाव तालुक्यातील शेनद, धारेगाव, धारमोहा, बेलदरी आणि टेंभुरधरा हा भाग जंगलव्याप्त आहे. या परिसरात वाघाचा वावर वाढल्याने शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या तीन-चार दिवसांपूर्वीच धारेगाव परिसरातही एका वासरावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले होते. ही या परिसरातील दुसरी मोठी घटना आहे. काही महिन्यांपूर्वी मोहदी आणि सातघरी शिवारात बिबट्याने शेतकèयांवर हल्ले केले होते. त्याची दहशत अजूनही कायम आहे.
सतत होणाèया हल्ल्यांमुळे शेतकèयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. बिबट्या आणि वाघांचा बंदोबस्त करण्यात वनविभागाचे पथक अपयशी ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
वनपरिक्षेत्र विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन नरभक्षक होण्यापूर्वीच या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी आता शेनद आणि परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.