तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
mineral-scam : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनीज गैरप्रकार प्रकरणी ईटीएस मोजणी करुन दोन महिण्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले होते. या प्रकरणात ईटीएस मोजणीला सुरुवात झाली असून तक्रारकर्त्याला अंधारात ठेऊन मोजणी केली जात असल्याने अमोल कोमावार यांनी विधानसभा उपाध्यक्षांकडे तक्रार दाखल केली आहे.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील कोट्यवधी रुपयांचा गौण खनीज घोटाळा चांगलाच गाजत आहे. या प्रकरणातील जबाबदार अधिकाèयांची बैठक विधानसभा उपाध्यक्षांनी नागपूर अधिवेशन दरम्यान बोलविली होती. ईटीएस मोजणीचे आदेश दिले असताना टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे अधिकाèयांना जाब विचारण्यात आला. एवढेच नव्हे तर येत्या दोन महिण्यात ईटीएस मोजणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. अहवाल सादर न केल्यास जबाबदार अधिकाèयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेसुध्दा अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले होते.
त्यामुळे या गौण खनीज घोटाळा प्रकरणी ईटीएस मोजणी सुरु झाली आहे. ही मोजणी केली जात असताना तक्रारकर्ता मोजणीस्थळी उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र त्याला माहिती न होऊ देताच मोजणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अमोल कोमावार यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे तक्रार देऊन याकडे लक्ष वेधले. या तक्रारीची दखल घेऊन अण्णा बनसोडे यांनी जिल्हाधिकाèयांना पत्र देऊन अमोल कोमावार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पारदर्शक मोजणी व्हावी
ईटीएस मोजणी करताना तज्ञ व्यक्तींचा सहभाग असणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात असे होताना दिसून येत नाही. ज्या भागात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनीज उत्खनन झाले आहे तो भाग जाणीवपुर्वक वगळला जाण्याची भिती आहे. या घोटाळ्यात कंत्राटदारांसह अनेक अधिकारी सहभागी असल्यामुळे गेल्या पाच वर्षापासून तक्रारी करुनही कुठलीच कारवाई केली जात नाही. विशेष म्हणजे यापूर्वीसुद्धा मी ईटीएस मोजणी करताना माझ्या समक्ष करावी अशी मागणी केली आहे, मात्र तरीही माझ्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. आता ईटीएस मोजणी होत असल्यामुळे पारदर्शक मोजणी होण्यासाठीच माझ्या समक्ष मोजणी करण्याची मागणी केली आहे.
- अमोल कोमावार