एनडी आर्ट वर्ल्डमध्ये ‘कार्निव्हल’ उत्सवाचे धमाल वातावरण!

महाराष्ट्र शासनाकडून नावीन्य उपक्रमांची सुरुवात

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
मुंबई,
ND Art World carnival मुंबई जवळील कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये सिनेप्रेमींना खास अनुभव देणारा ‘कार्निव्हल’ उत्सव रंगला. मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय व नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत हा उपक्रम खेळीमेळीच्या आणि आनंददायी वातावरणात पार पडला. एनडी आर्ट वर्ल्डमध्ये सात दिवस चालणाऱ्या या कार्निव्हलमध्ये चित्रपटप्रेमींसाठी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांची मांडणी करण्यात आली होती.
 

ND Art World carnival 
एनडी स्टुडिओची निर्मिती २००५ साली नितीन चंद्रकांत देसाई यांनी मुंबईजवळील कर्जत येथे केली होती. ५२ एकरवर पसरलेल्या या स्टुडिओमध्ये आतापर्यंत अनेक ऐतिहासिक आणि लोकप्रिय चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. यामध्ये अमिर खानचा मंगल पांडे, मधुर भांडरकर यांचा ट्रॅफिक सिग्नल, आशुतोष गोवारिकर यांचा जोधा अकबर, तसेच सलमान खानच्या प्रेम रतन धन पायो, किक, बॉडीगार्ड आणि वॉन्टेड यांसारखे सिनेमाही शूट झाले आहेत. या सिनेमांच्या शूटिंगदरम्यान कलाकारांनी स्टुडिओत दीर्घकाळ राहून काम केले आहे. उदाहरणार्थ, ऐश्वर्या राय आणि ऋतिक रोशन यांनी जोधा अकबरच्या शूटिंगसाठी सहा महिने इथे ठसवले होते, तर सलमान खान जवळपास ९० दिवस या सेटवर कामात व्यस्त राहिला.
 
 
 
महाराष्ट्र शासनाने ND Art World carnival नितीन देसाई यांच्या या एनडी स्टुडिओची जबाबदारी स्वीकारून तिथे नवोन्मेष उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांतर्गत कला, मनोरंजन आणि सामाजिक उपक्रमांचा समावेश केला जात आहे. ‘कार्निव्हल’च्या औपचारिक उद्घाटनाचे काम पुणे येथील ‘आय डे केअर’ संस्थेतील अंध मुलांच्या हस्ते करण्यात आले, ज्यामध्ये स्टुडिओतील कर्मचारी, महामंडळाचे पदाधिकारी आणि उपस्थित पर्यटक सहभागी झाले.
 
 
उत्सवात मुलांसाठी खास कार्यक्रम ND Art World carnival आयोजित करण्यात आले होते. यात सांता कॉलज, कुंभारकाम, ट्याटू, पपेट शो, जादूचे प्रयोग, विविध खेळ, खाद्यपदार्थ, गाणी, नृत्य आणि एनडी स्टुडिओतील सेटसची सफर यांचा समावेश होता. ३१ डिसेंबरला कामशेत, लोणावळे येथील ‘मायेचा हात सोशल फौंडेशन’ येथील अनाथ मुलांच्या उपस्थितीत समारोप केला गेला.महामंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि एनडी आर्ट वर्ल्डमधील कर्मचारी यांच्या सहकार्यातून आयोजित या कार्निव्हलमध्ये सहभागी पर्यटक व सिनेप्रेमींना अद्वितीय अनुभव मिळाला. भविष्यात विविध दिवशी कार्यशाळा, निवासी अभ्यासक्रम व विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन असून, यासाठी महामंडळाकडून विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.