नवी दिल्ली,
obscene-act-by-man-and-woman भारतीय रेल्वे आणि रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम (RRTS) मधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिल्ली–मेरठ मार्गावर धावणाऱ्या ‘नमो भारत’ एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या एका प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाची चिंता वाढली आहे. या ट्रेनमधील एका तरुण आणि तरुणीचा आक्षेपार्ह वर्तन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, तो सीसीटीव्ही फुटेज असल्याचे सांगितले जात आहे.

सुमारे २० सेकंदाच्या या व्हिडिओत संबंधित तरुण-तरुणी सार्वजनिक ठिकाणी अत्यंत अशोभनीय अवस्थेत दिसत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबरच सार्वजनिक ठिकाणी शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. obscene-act-by-man-and-woman अनेकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया देत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणानंतर रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली असून, सीसीटीव्ही फुटेज कसे बाहेर गेले याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, ट्रेन किंवा स्थानकांवर कोणतेही गैरप्रकार आढळल्यास त्वरित अधिकृत कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी. तसेच, अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नयेत, कारण त्यामुळे कायदेशीर अडचणी उद्भवू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सौजन्य : सोशल मीडिया
या घटनेमुळे आधुनिक रेल्वे सेवांमधील देखरेख, सीसीटीव्ही सुरक्षेची गोपनीयता आणि प्रवाशांची जबाबदारी यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.