राम रहीमला ४० दिवसांची पैरोल, तुरुंगातून बाहेर येण्याची पंधरावी वेळ

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
चंदीगड, 
ram-rahim40-days-of-parole सिरसा येथील डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगला हरियाणा सरकारने १५ व्यांदा उदारता दाखवली आहे. त्याला ४० दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात येत आहे. यापूर्वी त्याला अनेक वेळा तुरुंगातून सोडण्यात आले आहे. त्याच्या दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्याबद्दल तो २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्याला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
 
ram-rahim40-days-of-parole
 
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्याची यापूर्वी ४० दिवसांच्या पॅरोलवर सुटका झाली होती. या काळात त्यानी डेरा मुख्यालयात सत्संग आणि प्रवचनही केले होते. गुरमीत राम रहीमला २०१७ मध्ये दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्याबद्दल २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ram-rahim40-days-of-parole २०१९ मध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येसाठीही त्याला दोषी ठरवण्यात आले होते. शिवाय, २००२ मध्ये त्याला स्वतःच्या व्यवस्थापक रणजीत सिंग यांच्या हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तथापि, मे २०२४ मध्ये, त्याला आणि इतर चार आरोपींना - अवतार सिंग, कृष्ण लाल, जसबीर सिंग आणि सबदिल सिंग - यांना "दोषपूर्ण आणि शंकास्पद तपास" असे कारण देऊन निर्दोष मुक्त करण्यात आले.
गेल्या जानेवारीत, राम रहीमला २० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला, त्यानंतर एप्रिलमध्ये २१ दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला. ram-rahim40-days-of-parole ऑगस्टमध्ये, त्याला आणखी ४० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला. त्याच्या वारंवार सुटकेमुळे प्रश्न निर्माण झाले आहेत. मागील वर्षांमध्ये, राम रहीमला निवडणुकीच्या सुमारास तुरुंगातून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे.