नागपूर,
Ramai Mahila Mandal बहादुरा येथील शिर्डी नगरमध्ये रमाई महिला मंडळाच्या वतीने पंचशील झेंडा परिसरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दमयंता धनविजय, रखमाबाई रामटेके, कविता गावले व जासुंदा गेडाम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती देत स्त्री शिक्षण, स्वाभिमान, सतीप्रथा, बालविवाह, महिलांचे हक्क व सहभाग यांसाठी त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्यात आला.“जर सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का?” Ramai Mahila Mandal अशा भावपूर्ण शब्दांत सावित्रीबाईंच्या कार्याचा प्रभाव अधोरेखित करण्यात आला.यावेळी सघमित्रा मस्के, नंदा घोडके, शालिनी धनविजय, नेहा मस्के, विनीत मस्के, प्रियंका पिल्लेवन, ज्योती शहारे, रंजना चिंचोळे, श्रेयांश शहारे, अर्चना मुंघाटे व संजय घोडके यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन सुषमा गायधने यांनी केले, तर आभार डॉ. श्रीकांत शहारे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमाई महिला मंडळ व चारिका फाउंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र