बुलढाणा,
sanjay-gaikwad : शहरातील राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ घडवत भाजपा, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), समाजवादी पार्टी, एमआयएम तसेच काँग्रेस या विविध पक्षांना मोठे खिंडार देत असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. हा भव्य पक्षप्रवेश सोहळा दि. ४ जानेवारी रोजी शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय बुलढाणा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

आ. संजय गायकवाड यांच्या विकासाभिमुख,जनहितकारी व विश्वासार्ह नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांतील मान्यवर पदाधिकार्यांनी शिवसेनेची वाट निवडली. यामुळे बुलढाण्यात शिवसेनेची ताकद आणखी भक्कम झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. या पक्षप्रवेशामध्ये प्रामुख्याने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष उदय देशपांडे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील सपकाळ,भाजपा शहर सरचिटणीस अरविंद होंडे, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पद्मनाभ बाहेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी शहराध्यक्ष मंगेश बिडवे, भाजपा महिला आघाडीच्या स्मिता चेकेटकर, अलका पाठक, वैभव इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी नगरसेवक सत्तार कुरेशी, विद्यमान नगरसेवक पती युनूस कुरेशी, जावेद शेख, भाजप किसान आघाडी शहराध्यक्ष आशुतोष वाईकर, एमआयएमचे रईस हाफिज, लुकमान कुरेशी, बुडन लकडी, काँग्रेसचे नदीमभाई तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वैशाली विजय गवई यांचा समावेश आहे.
या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यास नगरपरिषद गटनेता तथा महाराष्ट्र युवासेना कार्यकारणी सदस्य मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाऊंडेशन अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड,शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना जिल्हा समन्वयक संजय हाडे, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे,महिला आघाडी जिल्हा समन्वयक अनुजा सावळे, विधानसभा समन्वयक पद्मा परदेशी, वर्षा तायडे, गणेशसिंग राजपूत, शब्बीर कुरेशी, मयुरी देशपांडे, रामेश्वरी चव्हाण, गणेश बस्सी, मोईन काझी, अॅड. शफीक खान, बाबा शेख, उपशहर प्रमुख निशाद येरमुले, मोहन पर्हाड, बंडू आसाबे, बबलू मावतवाल,योगेश परसे, अमित ठाकरे, राहुल सुरडकर,नितीन श्रीवास, अनिल गाढे,शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.