नवी दिल्ली,
Transfers-IAS-IPS : गृह मंत्रालयाने मोठ्या प्रशासकीय फेरबदलात एकूण ४९ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये ३१ आयएएस आणि १८ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गृह मंत्रालय केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करते. परिणामी, गृह मंत्रालयाने बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. दिल्लीसह, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार, लडाख, गोवा, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, मिझोराम, चंदीगड, लक्षद्वीप, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली येथील अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे.
या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
नाव (बॅच) - मूळ कॅडर - नवीन कॅडर
अश्वनी कुमार (1992)- दिल्ली- जम्मू आणि लडाख
संजीव खिरवार (1994)- लडाख- दिल्ली
संतोष डी. वैद्य (1998)- जम्मू आणि काश्मीर- दिल्ली
पद्मा जैस्वाल (2003)-पुद्दुचेरी- दिल्ली
शुभीर सिंग (२००४)- दिल्ली- लडाख
आर. ॲलिस वाझ (2005)- दिल्ली- जम्मू आणि काश्मीर
यशपाल गर्ग (२००८)- अरुणाचल प्रदेश- दिल्ली
संजीव आहुजा (२००८)- गोवा- जम्मू आणि काश्मीर
निरज कुमार (२०१०)- जम्मू आणि काश्मीर- दिल्ली
सय्यद आबिद रशीद शाह (२०१२)- जम्मू आणि काश्मीर-चंदीगड
सत्येंद्र सिंग दुर्सावत (२०१२)- अंदमान आणि निकोबार-दिल्ली
अमन गुप्ता (२०१३)-अंदमान आणि निकोबार-दिल्ली
राहुल सिंग (२०१३)-लक्षद्वीप-दिल्ली
अंजली सेहरावत (२०१३)-दिल्ली-जम्मू आणि काश्मीर
हेमंत कुमार (२०१३)-दिल्ली-मिझोराम
रवी दादरीच (२०१४)-दिल्ली-अंदमान आणि निकोबार
सागर डी. दत्तात्रय (२०१४)-दिल्ली-पुद्दुचेरी
किन्नी सिंग (२०१४)-DNH आणि DD-जम्मू आणि काश्मीर
अरुण शर्मा (२०१५)-अंदमान आणि निकोबार-दिल्ली
वंदना राव (2015)-दिल्ली-अंदमान आणि निकोबार
बसीर-उल-हक चौधरी (2015)-जम्मू आणि काश्मीर-लडाख
मायकेल एम. डिसूझा (2016)-लडाख-गोवा
आकृती सागर (2016)-अरुणाचल प्रदेश-जम्मू आणि काश्मीर
कुमार अभिषेक (2016)-दिल्ली-जम्मू आणि काश्मीर
सलोनी राय देसाई (2016)-DNH आणि DD-दिल्ली
निखिल आर. देसाई (2016)-जम्मू आणि काश्मीर-गोवा
अंकिता मिश्रा (2018)-गोवा-चंदीगड
हरी कलिक (२०१८)-चंदीगड-अरुणाचल प्रदेश
विशाखा यादव (२०२०)-अरुणाचल प्रदेश-दिल्ली
अझरुद्दीन झहीरुद्दीन काझी (२०२०)-अंदमान आणि निकोबार-दिल्ली
चीमाला शिव गोपाल रेड्डी (२०२०)-मिझोराम-दिल्ली