ट्रम्प यांच्या निर्णयाचा इराणवर परिणाम: खामेनींचा दंगेखोरांविरोधात कठोर आदेश

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
तेहरान, 
khamenei-strict-orders-against-rioters इराणमध्ये ढासळती अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय चलन रियालच्या सतत घसरत चाललेल्या मूल्यामुळे उसळलेले आंदोलन आता हिंसक वळणावर पोहोचले आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या अस्थिरतेदरम्यान अखेर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी मौन सोडले असून, सुरक्षा यंत्रणांना आंदोलनकर्त्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्यामुळे तेहरानमधील तणाव आणखी वाढला आहे.
 
khamenei-strict-orders-against-rioters
 
सरकारी दूरचित्रवाणीवरून केलेल्या संबोधनात 86 वर्षीय खामेनी यांनी शांततामय आंदोलन करणारे आणि दंगेखोर यांच्यात स्पष्ट फरक असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी शांतपणे निषेध करणाऱ्यांशी संवाद साधावा, मात्र हिंसाचार करणाऱ्यांशी चर्चा करून काही साध्य होणार नाही, असे ते म्हणाले. khamenei-strict-orders-against-rioters अशा घटकांना “त्यांची जागा दाखवली पाहिजे,” असे सांगत त्यांनी कठोर कारवाईचे समर्थन केले. इराणमधील अशांततेमागे अमेरिका आणि इस्रायलसारख्या परकीय शक्तींचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच रियालच्या घसरणीसाठीही “शत्रू” जबाबदार असल्याचा दावा खामेनेई यांनी केला.
सध्या देशातील 31 पैकी 22 प्रांतांमध्ये आंदोलन पसरले असून, शनिवारी रात्री झालेल्या ताज्या हिंसाचारात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे. khamenei-strict-orders-against-rioters शिया धर्मगुरूंचे प्रमुख केंद्र मानल्या जाणाऱ्या कोम शहरात ग्रेनेडचा स्फोट होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार, हा व्यक्ती लोकांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने ग्रेनेड घेऊन जात होता. याचवेळी हरसिन भागात रिव्होल्यूशनरी गार्डच्या ‘बासिज’ पथकातील एका सदस्याचा गोळीबार आणि चाकू हल्ल्यात मृत्यू झाला.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी इशारा दिला होता की, जर तेहरानने शांततामय आंदोलनकर्त्यांवर जीवघेणे हल्ले केले, तर अमेरिका त्यांच्या मदतीसाठी पुढे येईल. khamenei-strict-orders-against-rioters यानंतर शनिवारी ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्याचा दावा केला. मादुरो हे ईरानचे निकटवर्तीय मानले जात असल्याने, या घोषणेमुळे इराणी नेतृत्व अधिक सतर्क झाले आहे. प्रत्युत्तरादाखल इराणी अधिकाऱ्यांनी मध्य पूर्वेत तैनात असलेल्या अमेरिकी सैन्यावर कारवाई करण्याची धमकी दिली आहे.
मानवाधिकार संघटनांच्या माहितीनुसार, देशभरात 100 हून अधिक ठिकाणी निषेध सुरू आहेत. जरी हे आंदोलन 2022 मध्ये महसा अमीनी यांच्या मृत्यूनंतर उसळलेल्या व्यापक आंदोलनाइतके तीव्र नसले, तरी आर्थिक संकट आणि रियालची ऐतिहासिक घसरण यामुळे सामान्य नागरिकांमधील असंतोष कमालीचा वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे.