बुलढाणा,
chikhli-accident : त्र्यंबकेश्वर नगरीत हायवा अपघात दुर्दैवी ठरला शिवम राजेश उंबरहांडे (वय २२, रा. पांगरी उंबरहांडे, ता. चिखली) आणि भूमिका समाधान खेडेकर (वय २१, रा. अंत्री खेडेकर, ता. चिखली) हे दोघे दुचाकीवरून नाशिकच्या दिशेने जात असताना गोदावरी नदीवर असलेल्या पुलाजवळ हायवा (क्र. एमएच १५ जेआर ४४०४) पलटी होऊन त्यांच्यावर कोसळले शिवम आणि भूमिका जागीच ठार झाल्याची घटना दि. ३ जानेवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
हायवामध्ये मोठ्या प्रमाणावर डेब्रिस वाहून नेत होते. त्यातील दगड आणि अवजड वस्तूंच्या जोरदार ठोकेने पोलिस चौकीतील कर्मचारी आणि स्थानिकांनी त्वरित जेसीबी बोलावून दोघांना हायवा खालून बाहेर काढले पण तेव्हा दोघांचा जीव वाचवता आला नाही. या घटनेमुळे भाविकांमध्ये, स्थानिकांमध्ये संतापाची लाट उठली आहे. नागरिकांनी अवैध आणि बेशिस्त हायवा वाहतुकीला कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.