समुद्रपूर,
sameer-kunawar : तालुक्यातील गिरड खुर्सापार परिसरात १२ महिन्यांपासून मुकामी असलेल्या एक वाघ, वाघीण, तीन पिल्लांनी शेतकरी शेतमजूर व नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली आहे. आ. समिर कुणावार यांच्या पाठपुरावाने आधी एका वाघाला तर आता वाघीण व तिच्या तिन्ही पिल्यांना जेरबंद करण्याचा आदेश वनविभागाला प्राप्त झाल्याने वाघ कुटुंबाला जेरबंद करण्याची जबाबदारी वनविभागाकडे आहे. आतापर्यंत या वाघांनी कोणत्याही मनुष्याला इचा पोहोचवली नसली तरी शेकडो पाळीव जनावरांना ठार केले आहे.

चंद्रपूर आणि वर्धा जिल्हा लगत असलेल्या समुद्रपूर तालुयातल एक वर्षांपासुन या वाघ परिवाराने दर्शन देणे सुरू केले होते. वाघोबा दिसताच जंभेरी उडत असल्याने शेत शिवारात काम करायला मजूर मिळत नाही. त्यामुळे या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकर्यांनी वारंवार केली. आंदोलनंही केले. आ. कुणावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वैयतिक विनंती केले. हिवाळी अधिवेशनात बैठकही लागली. त्यापूर्वी एका वाघाला जेरबंद करण्याची परवानगी ३ महिन्यापुर्वीच देण्यात आली होती. त्या वाघाला जेरबंद करण्यासाठी युद्ध पातळीवर सुरू आहेत. तीन महिने लोटूनही वाघोबा वनविभागाला हुलकावनी देतो आहे. त्यामुळे नागपूर व वर्धा वनविभागाला सयुक्त मिशन राबविण्याचे आदेश मिळाले होते. आ. कुणावार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी फोनवर चर्चा करून वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी केली होती.
मुख्यमंत्री फडणवीस हिंगणघाटात आले असता त्यांनाही पाचही वाघांना जेरबंद करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी निवेदनातून केली होती. हिवाळी अधिवेशनादरम्यान वनमंत्री नाईक, आ. कुणावार यांच्यासह वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या बैठकीत आ. कुणावार यांनी वाघांचा मुद्दा उपस्थित करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली होती. ३ महिन्यापासून उपवनसंरक्षक हरबिदर सिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात वाघाला पकडण्यासाठी ५० वर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वाघाच्या मार्गावर असून जंगल परिसरात शेकडो स्ट्राप कॅमेर्यांसह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. २ ड्रोन कॅमेरे सुद्धा रोज जंगल परिसरात घिरट्या घालत आहेत. आ. कुणावार यांच्या पाचही वाघांना जेरबंद करण्याच्या आग्रही मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाने वाघीण व तिच्या तिन्ही पिल्याना जेरबंद करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे आता वनविभागाच्या टिमचा गिरड खुर्सापार परीसरात दहशत निर्माण करणार्या या पाचही वाघांना जेरबंद करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मतदार संघातील प्रत्येक समस्या आपली : आ. कुणावार
गिरड खुर्सापार परीसरात गेल्या वर्षभर्यापासुन वाघ, वाघीण व तिचे तीन अपत्यांनी शेतकरी व नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण केली आहे. या मतदार संघातील प्रत्येक समस्या आपण आपली स्वत:ची समजतो. त्यामुळे शेतकर्यांची अडच लक्षात घेऊन आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन वनमंत्री गणेश नाईक व संबंधित वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेऊन या पाचही वाघांना पकडून नेण्याची मागणी लावून धरली. मागणीची दखल घेऊन वाघांना जेरबंद करण्याचे आदेश वनविभागाला दिले आहे. आपल्या मागणीला गांभीर्याने घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक यांचे आभार व्यत करतो व वनविभागाने आता पाचही वाघांना पकडून घेऊन जावे, अशी प्रतिक्रिया आ. कुणावार यांनी तरुण भारत सोबत बोलताना दिली.