‘बॉलिंग स्किल गेम’च्या नावावर ‘जुगार’; १० जणांवर गुन्हे दाखल

*७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
वर्धा, 
bowling-skill-game-gambling : ‘बॉलिंग स्किल गेम’च्या माध्यमातून जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने कारवाई केली. ३ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत दहा जुगार्‍यांवर गुन्हे दाखल करून ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त गेला.
 
 
 
JKL
 
 
 
पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी अवैध व्यवसाय करणार्‍यांवर धडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यावरून ३ रोजी स्थानिक गुन्हे शाखाच्या पोलिसांच्या चमूने वर्धा शहरातील वर्धा रेल्वे स्टेशन समोरील दुकानाच्या चाळीतील नवदुर्गा बॉलिंग अली स्किल व्हिडिओ गेम पार्लरवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, दोन संगणक, प्रिंटर, स्कॅनर इतर साहित्य असा ७६ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भारत आमले रा. हिंदनगर वर्धा, संघपाल डंभारे रा. गणेशनगर बोरगाव मेघे, प्रतिक खोब्रागडे रा. हरिदासपेठ बडनेरा जि. अमरावती ह. मु. गणेशनगर वर्धा, विक्रांत समर्थ रा. रामनगर वर्धा, इरफान सैय्यद महमुद रा. सिद्धार्थनगर बोरगाव मेघे, लटारी आत्राम रा. बोरगाव मेघे, संदीप आत्राम रा. बोरगाव मेघे, सागर जाधव रा. पिंपरी पुनर्वसन सालोड, जितेंद्र आडे रा. वायगाव (भो.) ता. वरोरा जि. चंद्रपूर, नेल्सन अलेकझांडर डिकुस रा. बोरगाव मेघे यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
 
 
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, विजयसिंग गौमलाडू, ओमप्रकाश नागापूरे, सलाम कुरेशी, राहुल इंटेकर, कैलास सोनवणे, रोशन निबोळकर, अमरदीप पाटील, अरविंद येणूरकर, अमर लाखे, राजू अकाली, अभिषेक नाईक, रवी पुरोहित, हर्षल सोनटक्के, प्रफुल पुनवटकर, उदय सोलंखी, दिनेश करलुके, रितेश कुरडकर यानी केली.