वर्धेत १९ जुगार्‍यांवर गुन्हा; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

*व्हिडीओ गेमच्या आडून सुरू होता जुगार

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
वर्धा,
case-filed-against-gamblers : व्हिडीओ गेमच्या आडून सुरू असलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने कारवाई करून १९ जुगार्‍यांच्या मुसया आवळल्या. या कारवाईत ७ लाख ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ३ रोजी वर्धा रेल्वे स्थानक समोरील आठवडी बाजार परिसरात करण्यात आली.
 
 
 
K
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ३ रोजी आठवडी बाजार परिसरातील व्हीडिओ गेम पार्लरवर धडक कारवाई केली. पोलिसांनी पाहणी केली असता धनराज खैरकार हा नोकराच्या मदतीने ईलेट्रॉनिक मशिनचा वापर करीत जुगार व्यवसाय करीत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी गेम पार्लर मधील ३५ ईलेट्रॉनिक मशिन, ६८ हजार ५६० रुपये रोख असा ७ लाख ८३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
प्रवीण काखे रा. शिवाजी कॉलनी पुलगाव, दीपक ढोणे रा. डॉ. आंबेडकरनगर पुलगाव, विनोद मेश्राम रा. डॉ. आंबेडकर नगर पुलगाव, दिनेश धनविज रा. कवठा झोपडी पुलगाव, रवी गुप्ता रा. शिवाजी कॉलनी पुलगाव, यशवंत ठाकरे रा. महादेवपुरा वर्धा, आदित्य हराळे रा. आर्वी नाका वर्धा, लक्ष्मण रमानी रा. पोद्दार बगीचा वर्धा, सतिष बोघरानी रा. दयालनगर वर्धा, श्रीकांत बेलपांडे रा. माळवीनगर नागपूर, नीलेश राऊत रा. कारला चौक वर्धा, विशाल गावंडे रा. गजानन नगर वर्धा, रोशन दुबे रा. सिंदी मेघे, बंडू तायडे रा. आनंदनगर वर्धा, सतिष चुन्ने रा. आर्वी नाका वर्धा, सुभाष तायडे रा. समतानगर वर्धा, मनोज पाटील रा. विक्रमशिलानगर वर्धा, साहील डोंगरे रा. समतानगर वर्धा, धनराज खैरकार रा. पुलगाव ह. मु. नागपूर यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, विजयसिंग गोमलाङ, ओमप्रकाश नागापूरे, सलाम कुरेशी, राहुल इंटेकर, कैलास सोनवणे, रोशन निबोळकर, अमरदीप पाटील, अरविंद येणूरकर, अमर लाखे, राजू अकाली, अभिषेक नाईक, रवी पुरोहीत, हर्षल सोनटक्के, प्रफुल पुनवटकर, दिनेश करलुके, रितेश कुरडकर यांनी केली.