पाणी टंचाई निवारणाचे प्रस्ताव वेळेत सादर करा : पालकमंत्री भोयर

*वर्धा तालुक्याचा संभाव्य पाणी टंचाई आढावा

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
वर्धा, 
pankaj-bhoyar : प्रत्येक नागरिकाला पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे हा शासनाचा उद्देश आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही गावात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होतो. अशा गावांचे वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन पाणी टंचाई आराखडा तत्काळ सादर करा. उन्हाळा सुरू होण्यापुर्वी टंचाईग्रस्त गावातील प्रस्तावित सर्व कामे पुर्ण होणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
 
 
JK
 
 
 
पंचायत समितीच्या सभागृहात वर्धा तालुयातील संभाव्य पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठकीत आज रविवार ४ रोजी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, तहसिलदार संदीप पुंडेकर, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
 
पाणी टंचाई आराखडा तयार करताना आपण गावातील सध्याच्या लोकसंख्येचा विचार करतो. भविष्यातील वाढीव लोकसंख्येचा विचार देखील केला जावा आणि त्यानुसार आराखडे तयार करावे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध असलेच्या सार्वजनिक, खाजगी विहिरी, हातपंप, नळ योजनांच्या दुरुस्तीची गरज असल्यास तशी कामे पाणी टंचाई आराखड्यात घेण्यात यावी. जलजीवन अंतर्गत घेण्यात आलेली अपूर्ण असलेली कामे तात्काळ पुर्ण करण्याच्याही सूचना पालकमंत्री भोयर यांनी केल्या.
 
 
पाणी टंचाईचा प्रश्न वारंवार उद्भवू नये यासाठी नैसर्गिक पाणी स्त्रोत वाढविण्यासाठी तलावाचे खोलीकरण, गाळ काढणे, शेत तलाव याभर देण्यात येणार असून नागरिकांनी सुद्धा नैसर्गिक स्त्रोत वाढविण्यासाठी पावसाचे पाणी कसे साठविता येईल व भविष्यात येणार्‍या पाणी टंचाईपासून मुत होता येईल यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. पाणी टंचाईची कामे अतिशय काटेकोरपणे आणि काळजीपुर्वक केली जावी. येत्या उन्हाळ्यात जिल्ह्यात कुठेही टंचाईस्थिती निर्माण होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.
 
 
यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते पंचायत समिती येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नियंत्रण कक्षाचे उद्घाटन करण्यात झाले. बैठकीला सरपंच, तालुयातील ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी तसेच तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
 
 
यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या हस्ते पंचायत समिती अंतर्गत चार समुह बचत गटांना कर्जाचे वितरण करण्यात आले. यामध्ये महामाया स्वयंसहाय्यता महिला समूह गट पिपरी मेघे यांना ९ लाख, तुळजाई स्वयं सहायता महिला समुह पिपरी मेघे यांना १० लाख, गोंडवाना स्वयं सहायता महिला समुह गट वायगाव ७ लाख, वैष्णवी स्वयं सहायता समुह वायगाव १२ लाख तर वैशाली सुदर्शन खसाळे ज्ञानेश्वरी स्वयं सहायता महिला समुह यांना मंजूर झालेल्या ३ लाख १८ हजार रुपयाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.