तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
Chandrapur air pollution, गत वर्षातील प्रदुषनाची आकडेवारी पाहता, 365 दिवसात चंद्रपुरातील केवळ 78 दिवस प्रदूषण मुक्तीचे ठरले, उर्वरित 86 दिवस समाधानकारक, 187 दिवस प्रदूषणाचे, 13 दिवस जास्त प्रदूषणाचे ठरले, तर 1 दिवस अती प्रदूषित गेला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणाच्या आधारे ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.येथील पर्यावरण अभ्यासक आणि ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीयू प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाद्वारे दररोज 24 तास हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी गोळा करते. चंद्रपूर जिल्ह्यासोबतच शहरात आणि औद्योगिक क्षेत्र खुटाळा येथे सतत वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राद्वारे वायू प्रदूषणाची नोंद ही नोंद घेतली जाते. सदर आकडेवारी शहरातील बसस्थानकजवळ असलेल्या केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या केंद्रातील आहे. ही जरी शासकीय यंत्रणेद्वारे घेतलेली नोंद असली, तरी अनेक ठिकाणी या पेक्षाही जास्त प्रदूषण पाहायला मिळते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रदूषणाची पुरेशी आकडेवारी उपलब्ध नाही. परंतु, जिल्ह्यातील 4 औद्योगिक क्षेत्रात घुग्घूस आणि राजुरा येथे जास्त प्रदूषण आहे.
मागील पावसाळी 122 पैकी चांगले 59 दिवस आढळले. समाधानकारक 51 दिवस, प्रदूषित 12 दिवस आढळले. परंतु, अती प्रदूषित दिवस आढळले नाही. पावसाळ्यातील एकूण 4 महिन्यातील 122 दिवसापैकी 12 दिवस प्रदूषण होते. मागील वर्षी अतिशय पावसामुळे पावसाळ्यात प्रदूषण कमी झाले.
खरे तर हिवचाळा हा ऋतू अतिशय आरोग्यदायी असतो. परंतु, अलीकडे सर्व शहरे ही प्रदूषित झाल्यामुळे हा ऋतूसुद्धा प्रदूषणामुळे आरोग्यासाठी अतिशय हानीकारक ठरू लागला आहे. या ऋतूतील चांगले दिवस 14, समाधानकारक 14 दिवस, मध्यम प्रदूषण 92 दिवस, तर सर्वाधिक प्रदूषणाचे 3 दिवस आढळले. हिव्वाळ्यातील एकूण 123 दिवसांपैकी 95 दिवस प्रदूषण होते.
उन्हाळ्यातील बहुतेक सर्वच दिवस प्रदूषण
उन्हाळ्यातील फेब्रुवारी, मार्च एप्रिल, मे या महिन्यातसुद्धा प्रदूषण अधिक आढळले. या ऋतूतील चार महिन्यात केवळ 5 दिवस चांगले, 21 दिवस समाधानकारक, 83 दिवस प्रदूषित आणि 11 दिवस अती प्रदूषित आढळले. म्हणजेच उन्हाळ्यातील एकूण 120 दिवसापैकी 94 दिवस प्रदूषण होते.
वर्षात जास्त प्रदूषके कोणती काढळली
वर्षातील 365 दिवसात सर्वाधिक 304 दिवस धुलीकन होते. त्यात 10 मायक्रोमीटरची प्रदूषके, तर 262 दिवस, सूक्ष्म धुलीकण 2.5 ही 42 दिवस होती. 12 दिवस कार्बन मोनोक्साइडचे प्रदूषण, तर 8 दिवस जमिनीवरील धोकादायक ओझोन वायूचे होते. 14 दिवस नायट्रोजन ओक्साइडचे आढळले, सल्फर डाय ऑक्साइडचे 27 दिवस आढळले.