संघटनात्मक अपयश, अहंकार आणि चुकीच्या निवडीचा फटका

पुसद जिल्ह्यात भाजपाची कामगिरी घसरली

    दिनांक :05-Jan-2026
Total Views |

विजय आडे
उमरखेड,
BJP Pusad performance, राज्यात सर्वच पातळ्यांवर भारतीय जनता पार्टीसाठी पोषक वातावरण असताना, पुसद जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी जेमतेम राहिल्याने संघटनात्मक अपयश चव्हाट्यावर आले आहे. पुसद विधानसभा, उमरखेड विधानसभा अंतर्गत उमरखेड, महागाव, दिग्रस, दारव्हा व नेर तालुक्यांतील नगरपरिषद निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळणे, हे केवळ राजकीय विरोधामुळे नव्हे तर पक्षांतर्गत चुकीच्या निर्णयांचे थेट परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे.
 

BJP Pusad performance, 
जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांच्या नेतृत्वात पक्ष संघटना अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा होती. मात्र नगरसेवक, तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांच्या निवडीत झालेल्या गंभीर चुकांमुळे संघटन विस्कळीत झाले. वय, अनुभव, संघटनात्मक क्षमता किंवा निष्ठा या कोणत्याही निकषात न बसणाèया व्यक्तींना जबाबदाèया देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.
 
 
उमरखेड नगरपरिषदेत पक्षाचे नप अध्यक्षपदाचे उमेदवार निधी भुतडा यांचा पराभव हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. उत्तम इंगळे, प्रकाश देवसरकर, विजय खडसे व नामदेव ससाणे हे चार माजी आमदार, आ. किसन वानखेडे हे सत्तारूढ आमदार, सहकार क्षेत्रातील बळवंत नाईक, सुदर्शन रावते, शिवाजी माने, नितीन माहेश्वरी, अजय माहेश्वरी, अरविंद भोयर, अ‍ॅड. जितेंद्र पवार, आनंद चिकणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कृष्णा देवसरकर व भिमराव चंद्रवंशी हे दिग्गज नेते असतानाही नप पातळीवर प्रभावी प्रचार दिसून आला नाही. माजी आमदारांची भूमिका केवळ नावापुरती राहिल्याचा आरोपही आता उघडपणे होत आहे.
निवडणुकीपूर्वी काही निष्ठावंतांनी या बाबी डॉ. आरती फुफाटे यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीही ठोस अंमलबजावणी झाली नाही. नाराज कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न न झाल्याने असंतोष अधिकच वाढला, त्याचे प्रतिबिंब निकालात उमटले.एक सक्षम युवा नेतृत्व पुढे येऊ नये, यासाठी पक्षांतर्गत तसेच इतर पक्षीय नेत्यांनीही या निवडणुकीत ‘गेम’ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे पक्ष संघटनेला आतूनच सुरुंग लावला गेला, असा आरोप केला जात आहे.
या पृष्ठभूमीवर राज्यातील व प्रदेशस्तर भाजपा नेतृत्वाने या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेऊन पक्ष संघटनेत तातडीने फेरबदल करावेत, बिनकामाचे व खोगिरभरती केलेले पदाधिकारी हटवावेत आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
 
 
उमरखेड मतदारसंघात सलग तीन आमदार निवडून आणून ‘किंगमेकर’च्या भूमिकेत वावरणाèया नितीन भुतडा यांना अतिआत्मविश्वास व अहंकार नडला. तसेच उमेदवार निवडताना एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून इतरांना उमेदवारी दिली होती. या निवडीकडे नितीन भुतडा यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांना फटका बसला.