ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकाला फटका

    दिनांक :05-Jan-2026
Total Views |
वाशीम,
cloudy weather गत दोन-तीन दिवसापासून अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. गत महिन्याभरात कडायाची थंडी पडत असताना, या दोन दिवसात थंडी देखील कमी झाली आहे. ढगाळ वातावरणाने हरभरा पिकावर विविध प्रकारच्या अळीचे आक्रमण घोंगावात असल्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.
 

cloudy weather effect on chickpea crop 
या वर्षी अतिवृष्टी, सततधार पाऊस व निसर्गाचा लहरीपणामुळे सोयाबीन, तूर या पिकांना झालेल्या जोरदार पावसाचा फटका आणि यामुळे उशिरा हाती आलेले पीक नुकसानकारक ठरले. त्यात सोयाबीनला दर कमी मिळाल्याने शेतकर्‍यांना अधिकच नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकाच्या पेरणीवर शेतकर्‍यांनी भर दिला. सद्यस्थितीत हरभरा पीक फुटवे निर्माण करण्याच्या अवस्थेत आहेत. अशात ढगाळ वातावरणामुळे हरभर्‍यावर पाने खाणार्‍या व फांदे पोखरणार्‍या व घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शयता शेतकर्‍यांकडून वर्तवली जात आहे. बदलत्या ढगाळ वातावरणाने हवेतील आर्द्रता वाढते, जे बुरशीजन्य रोगाच्या प्रसारासाठी प्रतिकूल ठरते. उन्हाची कमतरता कमी झाल्यास, पिकाची रोग प्रतिकार शक्ती कमी होते आणि पीक रोगांना बळी पडण्याची शयता वर्तविण्यात येत आहे.
 
 
अळीची आर्थिक नुकसानीची पातळी कळण्याकरिता प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत. हरभरा हे पीक उंचीने खुजे असल्यामुळे शेतामध्ये इंग्रजी ऊ आकाराचे प्रति एकरी २० पक्षी थांबे लावावेत, जेणेकरून सकाळ व सायंकाळच्या वेळेला पक्षी त्यावर बसून त्यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणात अळ्या वेचून खाल्याने प्रादुर्भाव कमी होईल. घाटे अळी लहान अवस्थेत असताना एचएएनपीव्ही २५० एलई या विषाणू युक्त जैविक कीटकनाशकाची प्रती हेटरी या प्रमाणात फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.