भारतामध्ये बांगलादेश-नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा कट

पाकिस्तानकडून हनीट्रॅपला शस्त्र बनवण्याचा डाव

    दिनांक :05-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
situation-like-bangladesh-and-nepal-in-india भारतातील सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा गंभीर इशारा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारतात आपले हेरगिरीचे जाळे अधिक व्यापक करण्याच्या प्रयत्नात असल्याचे विविध तपासातून समोर आले आहे. केवळ सीमापार दहशतवादापुरते मर्यादित न राहता, भारताच्या आतूनच अस्थिरता निर्माण करण्याचा नवा डाव आयएसआयकडून आखला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
situation-like-bangladesh-and-nepal-in-india
 
गुप्तचर अहवालांनुसार, पाकिस्तान भारताविरोधात मोठ्या प्रमाणावर दुष्प्रचार मोहिम राबवण्याच्या तयारीत आहे. situation-like-bangladesh-and-nepal-in-india या मोहिमेचा मुख्य उद्देश भारतीय सशस्त्र दलांची प्रतिमा मलीन करणे आणि जनतेत अविश्वास पसरवणे हा आहे. आयडीआरडब्ल्यूच्या अहवालातून असेही समोर आले आहे की, आयएसआय आता थेट दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याऐवजी देशांतर्गत हिंसाचाराला खतपाणी घालण्याच्या रणनीतीवर काम करत आहे, जेणेकरून भविष्यात कोणतीही घटना घडल्यास पाकिस्तान स्वतःला त्यापासून दूर ठेवू शकेल.
सरकारी धोरणांविरोधात आंदोलनांना चिथावणी देणे, त्यांना हिंसक वळण देणे आणि सामाजिक असंतोष वाढवणे, हा या कटाचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. नुकतेच फरीदाबादमध्ये उघडकीस आलेले स्वदेशी दहशतवादी मॉड्यूल हे या व्यापक योजनेचा भाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. situation-like-bangladesh-and-nepal-in-india ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी नेटवर्क कमकुवत झाल्याने आणि घुसखोरी कठीण झाल्याने, आयएसआयने भारतातीलच नेटवर्क उभे करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान बांगलादेशवरही विशेष लक्ष ठेवून आहे. situation-like-bangladesh-and-nepal-in-india भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी बांगलादेशचा लाँच पॅड म्हणून वापर करण्याची शक्यता तपासली जात आहे. गुप्तचर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयएसआयच्या दोन सर्वाधिक धोकादायक योजना म्हणजे भारतभर हेरगिरीचे जाळे पसरवणे आणि बांगलादेश व नेपाळप्रमाणे मोठ्या प्रमाणावर आंदोलने उभी करून सरकारविरोधी वातावरण तयार करणे.
या सर्वात चिंताजनक बाब म्हणजे आयएसआयकडून हनीट्रॅपचा वापर प्रमुख शस्त्र म्हणून केला जात आहे. situation-like-bangladesh-and-nepal-in-india वैचारिकदृष्ट्या अस्थिर, आर्थिक अडचणीत असलेले किंवा वैयक्तिक समस्यांनी ग्रस्त असलेले लोक आयएसआयच्या टार्गेटवर आहेत. अशा व्यक्तींना अडकवून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एजन्सींच्या माहितीनुसार, या नेटवर्कसाठी आयएसआय मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करण्यास तयार आहे आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सशस्त्र दलांशी संबंधित माहिती मिळवण्याचे प्रयत्न अनेक पटींनी वाढले आहेत.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत. situation-like-bangladesh-and-nepal-in-india गृह मंत्रालयाने नुकतेच राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरण अमलात आणले असून, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि एटीएसची विशेष पथके विविध राज्यांमध्ये तैनात करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांना या धोरणाची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, पाकिस्तानच्या या कटकारस्थानांना रोखण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेला भक्कम करण्यासाठी हे धोरण निर्णायक ठरणार आहे.