मिनी गोल्फ राष्ट्रीय स्पर्धेत गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांची निवड

    दिनांक :05-Jan-2026
Total Views |
गडचिरोली,
Yatharth Lande 3 ते 8 जानेवारी दरम्यान नागपूर येथे होत असलेल्या राष्ट्रीय मिनी गोल्फ सब ज्युनिअर व जूनियर संघात गडचिरोली येथील कार्मेल स्कूलचे विद्यार्थी यथार्थ लांडे, नृप उंदीरवाडे व कारमेल स्कूल चामोर्शी येथील अनन्या वासेकर व कृष्णा पापडकर यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनाने महाराष्ट्र मिनी गोल्फच्या सब जुनियर संघात स्थान मिळवलेले आहे.

Yatharth Lande
त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय भारतीय मिनी गोल्फ संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे, एशियन मिनी गोल्फ संघटनेचे सचिव डॉ. सुरज येवतीकर, गडचिरोली जिल्हा मिनी गोल्फ संघटनेचे, सचिव प्रा. ऋषिकांत पापडकर, ओमप्रकाश संग्रामे, प्रा. रूपाली पापडकर व संजय मानकर प्रशांत मशाखेतरी, प्रसाद ताजने, आशिष निजाम, कपिल बागडे तसेच त्यांच्या आई-वडिलांना दिलेले आहे.