कराकस,
maduro-son अमेरिकेच्या लष्करी कारवाईत व्हेनेझुएलाचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक करून न्यूयॉर्कला नेण्यात आल्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मादुरो यांचा मुलगा आणि ला गुएरा राज्याचा खासदार निकोलस मादुरो गुएरा याने सोशल मीडियावर ऑडिओ संदेश जारी करत जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

या संदेशात गुएराने या घटनेमागे अंतर्गत कट असण्याची शक्यता व्यक्त करत, “खरा गद्दार कोण होता, हे इतिहासच ठरवेल आणि तोच सर्व सत्य उघड करेल,” असे ठामपणे सांगितले. maduro-son सत्ताधारी PSUV पक्षाचा सदस्य असलेल्या गुएराने समर्थकांना ५ जानेवारी रोजी रस्त्यावर उतरून एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. बाह्य आक्रमणाला तोंड देण्यासाठी राजकीय आणि लष्करी पातळीवर एकत्र राहण्याची गरज असल्याचेही त्याने अधोरेखित केले. गुएराने आपल्या भाषणात भावनिक सूर लावत पक्ष एकसंध राहील आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. आईची शपथ घेत तो म्हणाला, “आम्ही शांत आहोत, संयम राखून आहोत. लोकांमध्ये, रस्त्यावर तुम्हाला आम्ही दिसू. ते आम्हाला कमकुवत पाहू इच्छितात, पण आम्ही सन्मानाने झेंडा उंच ठेवू. दु:ख आहे, रागही आहे, पण ते जिंकू शकणार नाहीत.” त्याच्या या आवाहनानंतरव्हेनेझुएलामध्ये मादुरो समर्थक रस्त्यावर उतरू लागल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अधिकृत घोषणेत सांगितले की मोठ्या प्रमाणावर राबवलेल्या लष्करी मोहिमेनंतर मादुरो दाम्पत्याला काराकासमधून अटक करण्यात आली. maduro-son त्यांना USS इवो जिमा या युद्धनौकेद्वारे अमेरिकेत नेण्यात आले आहे. मादुरो दाम्पत्यावर अमली पदार्थ तस्करी आणि नार्को-दहशतवादाशी संबंधित कटाचे गंभीर आरोप असून, न्यूयॉर्कच्या फेडरल न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे. ही संपूर्ण कारवाई अमेरिकेच्या विशेष लष्करी दलांनी राबवली असून, वेनेझुएलातील अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, या मोहिमेवर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र टीका होत असून, अनेक देशांनी याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन ठरवत निषेध नोंदवला आहे.