मुंबई,
Nitin Gadkari Farah Khan Vlog लोकप्रिय कोरिओग्राफर व दिग्दर्शिका फराह खानच्या ताज्या व्लॉगमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी पाहुणे म्हणून दिसले. दिल्लीतील गडकरींच्या निवासस्थानी चित्रित हा व्लॉग फक्त हलकाफुलक्या क्षणांपुरता मर्यादित न राहता, पर्यावरणपूरक विचार, दैनंदिन शिस्त आणि साधेपणाची झलक दाखवणारा ठरला आहे.
शेणाची भिंत
व्लॉगची सुरुवातच Nitin Gadkari Farah Khan Vlog हास्यविनोदाने झाली. फराहसोबत आलेला तिचा कुक दिलीप घरात शिरताच चुकून स्विमिंग पूलमध्ये पडतो. काही क्षणांचा गोंधळ आणि हशा झाल्यानंतर दोघेही गडकरींच्या घरी पोहोचतात. वरिष्ठ राजकीय नेत्याला व्लॉगमध्ये पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाण्यामुळे फराह सुरुवातीला थोडी घाबरलेली दिसते, परंतु स्वागतानंतर ती आणि दिलीप गडकरींच्या कॉन्फरन्स रूममध्ये जातात.त्यांच्या खोलीतील भिंती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. काही भिंती शेणापासून तयार केलेल्या रंगाने रंगवलेल्या आहेत, जे उष्णता कमी ठेवणारे व पर्यावरणपूरक असल्याचे गडकरी सांगतात. गंमतीने त्यांनी फराह व दिलीपला विचारले, “कोणती भिंत साध्या रंगाची आणि कोणती शेणाच्या रंगाची?” दोघांनाही फरक ओळखता न आल्यावर गडकरींनी स्वतःच रहस्य उघड केले.फराहने गडकरींचा आदर व्यक्त करत हातमिळवणी केली, तर दिलीपने पायाला स्पर्श करून सन्मान दाखवला. आपल्या खट्याळ शैलीत फराह म्हणाली, “इतके मोठे व्यक्तिमत्त्व आमच्या व्लॉगवर पहिल्यांदाच आले आहे. एक विनंती आहे—हा (दिलीप) तुम्हाला थोडा त्रास देईल, पण ऐकून घ्या!” त्याच क्षणी दिलीपने ठामपणे मागणी केली, “सर, माझ्या दरभंगा गावात एक चांगला रस्ता करून द्या.” या साध्या मागणीवर गडकरी हसले आणि संवाद आणखी आपुलकीने भरला.
गडकरींनी आपल्या दैनंदिन Nitin Gadkari Farah Khan Vlog शिस्तीचा उल्लेख करत सांगितले, “आत्ता रात्री साडेनऊ वाजले आहेत. तुमच्यानंतरही माझ्या रात्री एक वाजेपर्यंत बैठका आहेत. सकाळी सात वाजता उठून मी अडीच तास व्यायाम करतो.” एकेकाळी १३५ किलो वजन असलेले गडकरी आज ८९ किलो वजनात तंदुरुस्त आहेत आणि त्यांचा असा शिस्तबद्ध दैनंदिन जीवनशैलीचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावरही दिसतो, असे ते हसत म्हणाले.राजकारणापलीकडील हा व्लॉग केवळ एका मंत्र्याची भेट दाखवणारा व्हिडिओ न राहता, गडकरींचा पर्यावरणपूरक दृष्टिकोन, साधेपणा, कामाविषयीची शिस्त आणि विनोदबुद्धी अधोरेखित करतो. फराहची हलकी-फुलकी शैली आणि दिलीपची थेट मांडणी यामुळे हा एपिसोड प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला असून सोशल मीडियावरही त्याची चर्चा रंगली आहे.