पंकजा मुंडेंचा ‘राजकीय शॉट’ चर्चेत! केली मोठो घोषणा

    दिनांक :05-Jan-2026
Total Views |
बीड,
pankaja munde राज्यात महापालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात दररोज नव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी पारंपरिक राजकीय समीकरणे बदलत असून, कट्टर विरोधक एकत्र येत असल्याचे चित्र आहे. अशाच घडामोडींमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 

pankaja munde 
संतोष देशमुख pankaja munde हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले. त्यानंतर वाढत्या दबावामुळे धनंजय मुंडे यांनी आरोग्याचे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या सर्व घडामोडींनंतर अनेक वर्षांपासून राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या वाटा चालणारे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पुन्हा एकत्र येत असल्याचे संकेत मिळू लागले होते.
 
 
परळी मतदारसंघ हा कायमच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू राहिला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला असलेली परळी, धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर एनसीपीकडे झुकली. अलीकडेच परळी नगरपालिका धनंजय मुंडे यांच्या ताब्यात गेल्याने या मतदारसंघातील राजकीय समीकरणे अधिकच बदलली होती. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये परळीतून नेमके कोण लढणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
 
 
 सभा गाजली 
याच चर्चांना पूर्णविराम pankaja munde देणारे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी एका जाहीर सभेत केले. भाषणादरम्यान त्या म्हणाल्या, “मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली आहे. आता परळी धनंजय मुंडे सांभाळतात. मला परळीवर जितकं प्रेम आहे, तितकंच प्रेम माळाकोळीवर आहे. आता मी माळाकोळी सांभाळणार.” पुढे बोलताना त्यांनी परळी हा धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ असल्याचे स्पष्ट करत, त्यावर प्रेम करण्याची जबाबदारी त्यांचीच असल्याचे सांगितले.पंकजा मुंडेंच्या या विधानामुळे परळीच्या राजकारणातून त्या काहीशा बाजूला सरकत असून, माळाकोळी मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे संकेत मिळत आहेत. माळाकोळी हा मतदारसंघ गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा राहिला असून, त्यांनी या भागावर विशेष लक्ष दिले होते. त्यामुळे पंकजा मुंडेंनी माळाकोळीबाबत व्यक्त केलेले प्रेम आणि सक्रियतेचे संकेत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत.या वक्तव्यानंतर बीड जिल्ह्यात परळी धनंजय मुंडे आणि माळाकोळी पंकजा मुंडे अशी स्पष्ट विभागणी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या नव्या समीकरणांचा नेमका कसा परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.